गोवा नोकरभरतीला खंडपीठाचे आव्हान

गोवा सरकारने ही निवड नोकरभरती प्रक्रिया नियमांनुसार केलेली नाही.
 IPHB recruitment
IPHB recruitment Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: बांबोळी येथील मनोरुग्ण इस्पितळात (IPHB) करण्यात आलेल्या नोकरभरती प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले आहे. या याचिकेवरील प्राथमिक सुनावणीनंतर गोवा खंडपीठाने सरकारला (Goa Government) व निवड झालेल्या उमेदवारांना नोटीस बजावून त्यांची बाजू मांडण्याचे निर्देश दिले आहेत. (Goa government did not conduct IPHB recruitment process as per the rules)

मनोरुग्ण इस्पितळामध्ये रुग्ण सेवा मदतनीस (पेशंट केअर अटेंडंट) पदासाठी 45 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. सरकारने ही निवड नोकरभरती प्रक्रिया नियमांनुसार केलेली नाही. त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया रद्दबातल ठरवून नव्याने करण्याचे निर्देश द्यावेत अशी विनंती करणारी याचिका लक्ष्मीकांत सज्जी व इतरांनी केली आहे. याचिकेत सरकारसह ज्या उमेदवारांची निवड झाली आहे त्यांनाही प्रतिवादी केले आहे.

 IPHB recruitment
त्रिनिदाद मार्टिन्स खुनात आणखी एकाचा हात?

यापूर्वी गोमेकॉ इस्पितळातील (Goa Medical Collage) विविध पदांसाठी झालेल्या नोकरभरती प्रक्रियेला आव्हान देण्यात आले आहे. ही आव्हान याचिका खंडपीठाने दाखल करून घेतली आहे व ती अंतिम सुनावणीसाठी ठेवली आहे. या याचिकेवरील जो काही निर्णय होईल तो निवड झालेल्या उमेदवारांना बंधनकारक असणार आहे असे खंडपीठाने स्पष्ट केले आहे.

 IPHB recruitment
32 लाखांच्‍या दागिन्‍यांवर डल्ला! गोवा पोलिसांची मध्‍य प्रदेशात फिल्मी स्टाईल कारवाई

दरम्यान, निवडणुकीपूर्वी राज्यात विविध खात्यांमध्ये नोकरभरती करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्यातील निवड प्रक्रियेतील त्रुटी तसेच पात्र उमेदवारांना डावलून व निवड प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाल्याने सरकारने ही प्रक्रियाच स्थगित ठेवली आहे व या प्रकरणाच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय समिती नियुक्त केली होती. मात्र ही चौकशी सुरू असताना राज्यात निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याने सर्वकाही ठप्प झाले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com