

पणजी: राज्य सरकारने स्वतंत्र आयुष खाते निर्माण करण्याचा अध्यादेश जारी केला आहे. त्यानुसार आरोग्य खात्यात कार्यरत आयुष विभाग आता स्वतंत्र खाते म्हणून काम करणार आहे. राज्य सरकारने राज्य प्रशासनात महत्त्वाचा बदल करत स्वतंत्र ‘आयुष’ खाते स्थापन करण्यासाठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. सर्वसाधारण प्रशासन खात्याने जारी करण्यात आलेल्या या अधिसूचनेनुसार, शासनाच्या कामकाज वाटप नियमांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.
राज्य घटनेंतर्गत मिळालेल्या अधिकारांचा वापर करून राज्यपालांच्या नावाने हा निर्णय जाहीर करण्यात आला असून, “राज्य सरकार कामकाज, ५६ वी दुरुस्ती नियम” या नावाने ही दुरुस्ती लागू करण्यात आली आहे. अधिसूचना प्रसिद्ध होताच ती तत्काळ प्रभावी झाली आहे. या नव्या निर्णयानुसार, शासनाच्या अनुसूचीमध्ये क्रमांक ५८ म्हणून ‘आयुष विभाग’ समाविष्ट करण्यात आला आहे. या निर्णयामुळे गोव्यात पारंपरिक भारतीय वैद्यक पद्धती आयुर्वेद, योग, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी यांना स्वतंत्र ओळख व बळकटी मिळणार असल्याचे मानले जात आहे. तसेच आरोग्य पर्यटन आणि पर्यायी उपचारपद्धतींना चालना देण्यासाठीही हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.
शासनाच्या या पावलामुळे आरोग्य व्यवस्थेत विविधता वाढून नागरिकांना पर्यायी उपचारांच्या अधिक सुविधा उपलब्ध होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
राष्ट्रीय आयुष मिशन आणि केंद्र शासनाच्या इतर योजनांची अंमलबजावणी.
आयुष रुग्णालये व दवाखान्यांचे प्रशासन व विकास.
वेळगे व मोतीडोंगर मडगाव येथील एकात्मिक आयुष रुग्णालयांचे व्यवस्थापन.
आयुष वेलनेस केंद्रांचे विकास व देखरेख.
योग, निसर्गोपचार व पंचकर्म उपचारांचा प्रसार.
होमिओपॅथी व आयुर्वेद परिषदांशी संबंधित कामकाज.
आयुष शिक्षण, संशोधन व प्रशिक्षणाला चालना.
वैद्यकीय व आरोग्य पर्यटनाला प्रोत्साहन.
राज्यातील आयुष प्रणालींच्या धोरणात्मक विकासाची आखणी.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.