Goa News: पणजीत 'तरंगती जेटी' अन् हायब्रीड फेरीबोटीचे अनावरण!

Goa News: भारतीय जलमार्ग प्राधिकरणाच्या वतीने देशभरातील नद्यांमधील जलमार्गांचा विकास करण्यात येतोय.
Goa News
Goa NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Goa News: केंद्र सरकारच्या बंदर जहाज आणि जलवाहतूक मंत्रालयाचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्‍या ‘नद्यांमधील जलमार्गाचा विकास’ याअंतर्गत पणजीत उभारलेल्या तरंगती (फ्लोटिंग) जेटी आणि हायब्रीड फेरीबोटीचे अनावरण आज होणार आहे.

केंद्रीय बंदर, जहाजबांधणी आणि जलमार्गमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) आणि अन्‍य मंत्र्यांची उपस्थिती असेल. देशात जलमार्गांचा विकास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या भारतीय जलमार्ग प्राधिकरणाच्या वतीने देशभरातील नद्यांमधील जलमार्गांचा विकास करण्यात येतोय.

Goa News
Dabolim Airport: टॅक्सी व्यवसायिकांनी ‘गोवा माईल्स’मध्ये सहभागी व्हावे; युनियनचा विरोध कायम

याअंतर्गत गोव्यात 14 फ्लोटिंग जेटी उभारण्यात येणार आहेत. यापैकी पणजीतील जेटीचा शुभारंभ उद्या होत आहे. भारताकडे सुमारे 14 हजार 500 किलोमीटरचा जलवाहतूक मार्ग आहेत. मात्र त्‍याद्वारे होणारी वाहतूक अत्यंत कमी आहे. ती वाढावी आणि रस्त्यांवरील ताण कमी व्हावा यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्‍याचाच एक भाग म्हणून जागोजागी कायमस्वरूपी किंवा तात्पुरत्या जेटी उभारण्यात येत आहेत.

Goa News
Rahul Gandhi: निष्ठावान,समर्पित कार्यकर्त्यांसह गोवा काँग्रेसची बांधणी करा

अशी आहे तरंगती जेटी

पणजीत (Panjim) मांडवी नदीमध्ये फेरीबोट धक्क्‍याजवळ ही तरंगती (फ्लोटिंग) जेटी उभारण्यात आली असून त्‍यासाठी 3.9 लाख रुपये खर्च आला आहे. हा तरंगता प्लॅटफॉर्म असून येथे नद्यांमध्‍ये वापरण्यात येणाऱ्या छोट्या बोटी पार्क करता येऊ शकतील वा प्रवाशांची चढउतार करता येऊ शकेल. या जेटीची लांबी 36 मीटर तर रुंदी 6 मीटर एवढी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com