Ajit Kadkade: सुप्रसिद्ध गायक अजित कडकडे यांना गोवा सरकाकडून 'गोमंत विभूषण' पुरस्कार जाहीर

Goa Government Award: गोव्याचे सुपुत्र आणि सुप्रसिद्ध गायक अजित कडकडे यांना गोवा सरकाकडून 'गोमंत विभूषण' पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
Gomant Vibhushan Goa Government Award
Ajit KadkadeDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्याचे सुपुत्र आणि सुप्रसिद्ध गायक अजित कडकडे यांना गोवा सरकाकडून 'गोमंत विभूषण' पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ३९ व्या घटक राज्य दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या पुरस्काराची घोषणा केली. कडकडे यांनी हा पुरस्कार गुरु जितेंद्र अभिषेकी आणि आई- वडिलांचा असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

"हा पुरस्कार सर्वप्रथम माझ्या आई-वडिलांचा त्यानंतर माझे गुरू पं. जितेंद्र अभिषेकी यांचा आहे. अभिषेकींमुळे माझी गायकी सुरू झाली आणि अजून सुरू आहे. त्याचप्रमाणे ज्या संतांच्या आशिर्वादाने मी गातो आणि जे रसिक हे गायन मनःपूर्वक ऐकतात त्यांचाही हा पुरस्कार आहे. सर्वात शेवटी हा पुरस्कार माझा. हा पुरस्कार मला जाहीर केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो," अशी प्रतिक्रिया अजित कडकडे यांनी 'गोमंत विभूषण' पुरस्कार जाहीर झाल्यानंतर गोमन्तक टिव्हीशी बोलताना दिली.

Gomant Vibhushan Goa Government Award
FDA Raid: पिळर्ण, पर्रा येथे एफडीएचा छापा; दोन मटण शॉप, IDC येथील कँटीन सील, काजू युनिटवरही कारवाई

अजित कडकडे यांनी जन्म गोव्यातील डिचोली येथे झाला असून, त्यांनी पंडीत जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे गायन शिकले. कडकडे यांची अनेक भक्तीपर गीते प्रसिद्ध आहेत. याशिवाय अनेक संगीत नाटकांमधून देखील काम करताना वेगळा ठसा उमटवला आहे. निघाली दत्ताची पालखी, दिगंबरा - दिगंबरा, गेला दत्त कोन्या गावा यासारख्या गीतांसह विविध अभंग देखील प्रसिद्ध आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com