Land Conservation: गोव्यात आणखी 12.96 लाख चौरस मीटर जमीन 'नो-डेव्हलपमेंट झोन'मध्ये; सात तालुक्यांचा समावेश

Goa No Development Zone: गरनियोजन खात्याने (टीसीपी) राज्‍यातील आणखी सुमारे १२.९६ लाख चौरस मीटर जमीन नो-डेव्हलपमेंट झोनमध्ये (एनडीझेड) आणली आहे.
Goa No Development Zone
Land ConservationDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: नगरनियोजन खात्याने (टीसीपी) राज्‍यातील आणखी सुमारे १२.९६ लाख चौरस मीटर जमीन नो-डेव्हलपमेंट झोनमध्ये (एनडीझेड) आणली आहे. मुख्य नगरनियोजक वेर्टिका डागुर यांनी याबाबतची अधिसूचना जारी केली आहे.

फोंडा, बार्देश, काणकोण, तिसवाडी, डिचोली, मुरगाव आणि सासष्‍टी या सात तालुक्‍यांतील १२,९६,३१९ चौरस मीटर जमीन ‘एनडीझेड’अंतर्गत आणण्यात आली आहे, असे डागुर यांनी जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे.

Goa No Development Zone
North Goa Final Voter List: उत्तर गोव्याची अंतिम मतदारयादी 4 जानेवारीला; वगळलेली नावे पुन्हा समाविष्ट करण्याची संधी

दरम्‍यान, पर्यावरण संरक्षण, शाश्वत विकास, पूर व नैसर्गिक आपत्तींपासून बचाव, मच्छीमार आणि शेतकऱ्यांच्या पारंपरिक हक्कांचे रक्षण, तसेच भूजल पातळी टिकवून ठेवण्याच्या उद्देशाने ‘टीसीपी’ने राज्यातील खारफुटी, खाजन, कमांड एरिया, जलस्रोतांच्या आसपासची जमीन, भातशेती, क्रीडांगणे, मीठागरे आदी परिसरांतील जमिनींचे रूपांतरण न करण्याचा निर्णय घेतला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com