मडगाव: ‘कोविड’ संकट काळात सरकारने (Goa Govenment) स्वस्त धान्य दुकानदरांना आलेले धान्य काढून ते लोकांना नेऊन वाटले; पण त्याची कोणतीच नोंद ठेवलेली नाही की सोपस्कार पूर्ण केलेले नाहीत. आता त्या धान्याची किंमत दुकानदारांकडून वसुल करण्याचे आदेश काढले जात आहेत, असा अखिल गोवा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने (Goa Fair Price Grain Shopkeepers Association) केला असून ते चुकीचे आहे व हा एक प्रकारचा घोटाळाच असल्याचे म्हटले आहे.
कोविड प्रतिबंधित क्षेत्रातील लोक त्यावेळी दुकानावर येत नव्हते व दुकानदारांनाही तेथे जाता येत नव्हते. त्यासाठी जिल्हाधिकारी, मामलेदार व अन्य अधिकारी यांनी तेथील लोकांना धान्य वितरीत करण्यासाठी ते नेले; पण त्याची नोंद दुकानदारांनी ठेवली. परंतु धान्य लोकांपर्यंत पोचल्याची नोंद पीएसओ मशिनमध्ये नाही. त्यामुळे ते धान्य शिल्लक असल्याचे दिसते. खात्याने मे ते जुलै 2020 या कालावधीत लाखो किलो धान्यवाटप केले. आता दुकानदारांना प्रतिकिलो 70 पैसे आकारले जात आहेत, असे हेन्रीक म्हणाले.
राज्यात सुमारे 550 स्वस्त धन्य दुकाने आहेत. त्यांच्याकडून सुमारे 5 लाख ग्राहकांना धान्यपुरवठा केला जातो. कोविड काळात या दुकानदारांना नेहमीच्या धान्यापेक्षा अधिक धान्य मोफत वाटप करण्यासाठी दिले होते. पण, त्या धान्याच्या वाहतुकीचा खर्च खात्याने दिला नाही.
- गांधी हेन्रीक्स, सरचिटणीस - स्वस्त धान्य दुकानदार संघटना
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.