Goa News: गरम पाण्‍याचा वापर करुन सिलिंडरचे सील काढून होतेय गॅसची चोरी!

Goa News: सिलिंडरमधून गॅसची चोरी होत असल्याचे प्रकार उघडकीस आल्याने ग्राहक धास्तावले आहेत.
Goa News | Gas Cylinders
Goa News | Gas Cylinders Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa News: सिलिंडरमधून गॅसची चोरी होत असल्याचे प्रकार उघडकीस आल्याने ग्राहक धास्तावले आहेत. भरलेल्या गॅस सिलिंडरचे प्लास्टिक सील काढण्यासाठी गरम पाण्याने भिजविलेल्या कपड्याचा वापर करण्यात येतो. त्यामुळे हे प्लास्टिकचे सील सैल होते व ते काढून त्‍यातील गॅस रिकाम्या व्यावसायिक सिलिंडरमध्ये भरला जातो.

किमान दोन ते तीन किलो गॅस काढला जातो व काढलेले प्लास्टिकचे सील पुन्हा बसविण्यात येते. त्‍यानंतर कमी वजनाचा गॅस सिलिंडर ग्राहकांना पुरविला जातो, अशी माहिती वजनमाप खात्याकडून देण्‍यात आली.

Goa News | Gas Cylinders
Goa News: क्रिकेट निवडणुकीतही रंगला राजकीय फड!

राज्यात ब्रँडेडच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात बनावट वस्तूंची विक्री केली जात असल्याने वजनमाप खात्याची पथके सक्रिय झाली आहेत. गॅस सिलिंडरच्‍या गोदामातून सिलिंडर चोरीचा पर्दाफाश झाल्याने गॅस सिलिंडर एजन्सी व गोदाममालकांचे धाबे दणाणले आहे.

तसेच, या पार्श्वभूमीवर वजनमाप खात्याने गेल्या नऊ महिन्यांत 504 आस्थापनांविरोधात कारवाई केली. तसेच त्यातील 387 प्रकरणे निकालात काढताना 21.55 लाख रुपयांचा दंडही वसूल केला आहे. गॅस एजन्सीचे गोदाम हे कार्यालयाकडून दूर शक्‍यतो निर्जनस्थळी असते. या गोदामांच्‍या परिसरात लोकवस्ती नसावी असा नियम आहे. त्यामुळे ही गोदामे वस्तीपासून बरीच लांब असतात. अशा ठिकाणी सहसा कोणी येत जात नाही. त्याचा फायदा गोदामातील कर्मचारी उठवितात

हल्लीच पर्वरी येथे गोदामावर टाकण्‍यात आलेल्‍या छाप्‍यावेळी तेथे काही अवजारे सापडली होती. कंपनीच्या गोदामातून आणलेल्या सिलिंडरमधून एजन्सीच्या गोदामात गॅस काढण्याचे प्रकार करण्यात येतात. विशेष म्‍हणजे ज्या वाहनांतून गॅस सिलिंडरचा पुरवठा केला जातो, त्या वाहनावरील कर्मचारी निर्जनस्थळी जाऊन गाडी उभी करून गॅस चोरतात.

Goa News | Gas Cylinders
Central Jail Of Goa: चक्क! दीड वर्षापूर्वी पॅरोलवर सुटलेला कैदी अजूनही फरार

स्वयंपाक गॅस सिलिंडरच्या वजनात काळेबेरे होत असल्याच्या तसेच काही गोदामांच्या ठिकाणी सिलिंडरमधून गॅस काढण्याचे प्रकार दिवसाढवळ्या सुरू असल्याच्या तक्रारी हिंदुस्तान पेट्रोलियम व भारत पेट्रोलियम या कंपन्‍यांकडून आल्या होत्या.

त्यानुसार वजनमाप खात्याच्या अधिकाऱ्यांनी पर्वरी व वेर्णा येथील गॅस सिलिंडरच्या गोदामांमध्ये छापा टाकला असता असे प्रकार घडत असल्‍याचे आढळून आले. तेथे गॅसची चोरी करण्‍यासाठी वापरण्यात आलेली अवजारेही जप्त करण्यात आली होती. दरम्‍यान, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या धडक कारवाईमुळे ग्राहकही सतर्क बनले आहेत.

त्यांनीही गॅस सिलिंडर पुरवठा करणाऱ्या वाहनांवरील कर्मचाऱ्यांकडे वजनकाटा नसल्याचे आढळून आल्यास वजनमाप खात्याशी संपर्क साधण्यास सुरवात केली आहे. तर, काही ग्राहकांनी सिलिंडरचे वजन केल्याशिवाय तो न घेण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे ग्राहक हळूहळू जागरूक होत असल्याचे दिसून येत आहे.

Goa News | Gas Cylinders
Goa News: राज्य सरकार जेटी धोरणा विरोधात ठाम; विरोधक मात्र आक्रमक

प्रसाद शिरोडकर, वजनमाप खात्‍याचे नियंत्रक-

ग्राहकांनी कोणतीही वस्तू खरेदी करण्यापूर्वी उत्पादनाची तारीख, कंपनीची माहिती तसेच खाद्यपदार्थ असल्यास त्याचा कालावधी आदी माहिती तपासून पाहावी. ही माहिती नसल्यास वजनमाप खात्याशी संपर्क साधावा.

भरलेला गॅस सिलिंडर घेताना त्याचे वजन नियमानुसार आहे की नाही याची शहानिशा करावी. गॅसपुरवठा करणाऱ्यांकडे वजनकाटा असणे सक्तीचे आहे. त्यामुळे लोकांनी जागृत राहण्याची गरज आहे.

खात्याची कामगिरी पुढीलप्रमाणे-

4155 तपासणी केलेली आस्थापने, 269 अचानक दिलेल्या भेटी, विविध शुल्क जमा 2.32 कोटी रुपये, प्रमाणित केलेली मापे 3201, प्रमाणित केलेली वजने 14,831.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com