POP Idols: देवाच्या उत्सवातही भेसळ! पीओपी मूर्तींना शाडूचा लेप लावून होतेय विक्री; विसर्जनस्थळी अजूनही मूर्तींचा खच

Ganesh Visarjan: जड मूर्ती कोणालाही नको, त्यातच आकर्षक मूर्ती असावी यासाठी लोकांकडून सर्रासपणे हलक्या व सुंदर ‘प्लास्टर ऑफ पॅरीस’ च्या मूर्ती आणल्या जातात.
Ganesh Visarjan
Ganesh Visarjan Dainik Gomantak
Published on
Updated on

साखळी: राज्यात मोठ्या गणेशमूर्ती पुजण्याची परंपरा कायम आहे, पण जड मूर्ती कोणालाही नको, त्यातच आकर्षक मूर्ती असावी यासाठी लोकांकडून सर्रासपणे हलक्या व सुंदर ‘प्लास्टर ऑफ पॅरीस’ च्या मूर्ती आणल्या जातात. या मूर्तींवर गोव्यात बंदी असतानाही त्या सरकारच्या नाकावर टिच्चून प्रवेश करतात, पुजल्याही जातात व त्यांचे विसर्जनही होते. विसर्जन आटोपून आता बरेच दिवस उलटले असले तरी विसर्जन स्थळांवर ‘पीओपी’ मूर्त्यांचा खच दिसून येत आहे.

चिकण मातीच्या भारी मूर्तींना पर्याय म्हणून गोव्यात महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातून मोठ्या प्रमाणात शाडू मातीच्या गणेशमूर्ती आणून पुरविण्याचे सत्र बऱ्याच प्रमाणात वाढले आहे. परंतु आता त्यातही भेसळ व बनावटगिरी पाहायला मिळते.

शाडू माती व पीओपी मिश्र मूर्ती विकल्या जातात. तसेच काही महाभागांनी तर थेट पीओपींच्या मूर्तींना आतून व बाहेरून शाडू मातीचा लेप लावून मूर्ती गोव्याच्या बाजारात व चित्रशाळांमध्ये पोहचविल्या आहेत. या प्रकारावर सरकारने कडक धोरण अवलंबले होते. पण गोव्याच्या बहुतेक चित्रशाळांमध्ये पीओपींच्या गणेशमूर्ती मोठ्या प्रमाणात दाखल झाल्याचे आता विसर्जनानंतर सिध्द होत आहे.

सरकारची मोठी जबाबदारी : दशरथ पेडणेकर

आज ज्या गणेशभक्तांनी आपापल्या घरात गणेशमूर्ती पूजन करून विसर्जित केल्या आहेत. त्यांनी विसर्जन स्थळांवर जाऊन या मूर्तीचे काय झाले ते पाहावे. हे पाहिल्यास पर्यावरणाला किती हानी होते, याची जाणीव होइल. तसेच पीओपींच्या मूर्ती सीमेवरून गोव्यात येणार नाहीत, याची काळजी सरकारने घ्यायला हवी, अशी प्रतिक्रिया साखळीतील माती कलाकार दशरथ पेडणेकर यांनी व्यक्त केली.

Ganesh Visarjan
POP Ganesh Idols: मांगल्याच्या उत्सवाला ‘पीओपी’ मूर्तींचे ग्रहण! नगण्य कारवाई, अगण्य भग्नावशेष..

फसवणूक थांबवावी : शेट

काही ठिकाणी शाडू मातीच्या मूर्ती असल्याचे सांगून पीओपींच्या मूर्ती विकल्या जातात. भाविकांसोबत होणारी ही फसवणूक बंद व्हायला हवी, अशी प्रतिक्रिया मयेचे आमदार तथा माती कलाकार प्रेमेंद्र शेट यांनी व्यक्त केली.

Ganesh Visarjan
बुक केलेली POP च्या मूर्त्या द्याव्या लागल्या; गोवा हस्तकला विभागाची मोहीम अयशस्वी

जैविक संपदेवर होणार परिणाम : केरकर

गोवा सरकार शाडू मातीच्या मूर्तीकारांना राजाश्रय देण्यासाठी प्रयत्न करीत आहे. तरीही पीओपी मूर्ती आणून विकल्या जातात. आज अनेक विसर्जन स्थळांवर विसर्जित करण्यात आलेल्या पीओपी गणेशमूर्तींचा परिणाम पाण्यातील जैविक संपदेवर होत आहे. आपले जलस्रोत प्रदूषित होत असून प्रत्येकाने ह्या मूर्ती आपण घरात पुजणार नाही, असा निर्धार करायला हवा, असे पर्यावरणवादी राजेंद्र केरकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com