निर्माल्यापासून खत; शेतकऱ्यांना आधार! म्हापसा ‘रोटरॅक्ट’चा उपक्रम

प्रदूषण रोखण्यासाठी विसर्जनस्थळी ३० निर्माल्य कलश
Goa Ganesh Festival 2023
Goa Ganesh Festival 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

योगेश मिराशी

नैसर्गिक स्त्रोतांच्या सौंदर्याला बाधा पोहचू नये तसेच नदीचे प्रदूषण टाळण्यासाठी नागरिकांनी गणेशोत्सव काळातील निर्माल्य नदीपात्रात टाकू नये यासाठी म्हापसा रोटरॅक्ट क्लब गेल्या वर्षापासून जनजागृती मोहीम राबवित आहे.

याच अनुषंगाने म्हापसा रोटरॅक्ट क्लबने हरित गणेश गोवा मोहिमेतंर्गत निर्माल्य कलश विविध विसर्जनस्थळी भक्तांसाठी उपलब्ध केले आहेत. या निर्माल्यपासून नंतर खत तयार केले जाते, जे नंतर शेतकऱ्यांमध्ये वाटप केले जाते.

Goa Ganesh Festival 2023
Goa Ganesh Festival 2023: पत्रीचा गणपती, खऱ्या अर्थाने होतेय निसर्गपूजन! अजूनही जपली जातीय अनोखी परंपरा

गणेशोत्सव काळात घरगुती तसेच सार्वजनिक गणेश पूजनस्थळी दररोज बाप्पाला फुले, पाने, दुर्वा, वस्त्र, फुलांचे हार अर्पण केले जाते. यातून मोठ्या प्रमाणात निर्माल्य तयार होते. अनेकदा हे निर्माल्य नदीपात्रात किंवा वाहत्या पाण्यात फेकले जाते. यातून नैसर्गिक स्त्रोतांच्या सौंदर्याला बाधा पोहचते. असे प्रकार टाळण्यासाठी म्हापसा रोटरॅक्ट क्लबने पुढाकार घेत विसर्जनस्थळी निर्माल्य कलशाची व्यवस्था भक्तगणांसाठी उपलब्ध केली आहे.

अशा विसर्जित विघटित निर्माल्यातून गोळा झालेल्या वस्तूंचा खत निर्मितीसाठी नंतर उपयोग केला जातो. म्हापशातील गणेश भक्तांसाठी तारीकडे, आकय आणि कुचेली या विसर्जितस्थळी निर्माल्य कलश उभारले आहेत.

त्यामध्ये भाविकांना फुले, पाने, दुर्वा, वस्त्र, फुलांचे हार या कलशामध्ये विल्हेवाट करण्याचे आवाहन केले आहे. हा विसर्जित कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावून खत तयार केले जाऊ शकते व नंतर ते मातीच्या संगोपनासाठी वापरण्यासाठी क्लबतर्फे शेतकऱ्यांना वितरित करता येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com