स्वातंत्र्यसैनिकांच्या संघर्षाला मिळणार उजाळा; आज प्रदर्शन

प्रदर्शनाचे उद्‍घाटन सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते होईल.
Freedom struggle
Freedom struggle Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी : पुराभिलेख व पुरातत्त्वशास्‍त्र संचालनालयातर्फे 18 जून रोजी क्रांतीदिनानिमित्त पुराभिलेख प्रदर्शन संस्कृती भवन पाटो- पणजी येथील कला दालनात प्रदर्शन आयोजित केले आहे.

Freedom struggle
फोंडा पालिकेचा सोपो कराचा लिलाव करण्याचा निर्णय

या प्रदर्शनात पोर्तुगीज राजवटीपासून मुक्तीसाठी स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेल्या संघर्षाला उजाळा मिळावा, यासाठी लष्करी लवाद (ट्रिब्युनल मिलीटर ट्युटोरियल) फायलींमध्ये आढळलेल्या गोव्याच्या स्वातंत्र्याच्या लढ्याशी संबंधित नोंदी प्रदर्शित केल्या जातील. प्रदर्शनाचे उद्‍घाटन सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते होईल.

यावेळी पुराभिलेख व पुरातत्त्वशास्‍त्र मंत्री सुभाष फळदेसाई उपस्थित असतील. या प्रदर्शनात विविध संस्थांद्वारे प्रसारित केलेल्या आणि पोर्तुगीज अधिकाऱ्यांनी स्वातंत्र्य सैनिकांकडून जप्त केलेल्या तसेच पोर्तुगीज राजवटीविरुद्धच्या स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या कारवाईंची साक्ष म्हणून वापरल्या गेलेल्या विविध पुस्तकांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa High Court SIR hearing
Cooperative societies financial transparency
Goa River Pollution
Shivaji Maharaj Statue Headland Sada
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com