Tanvi Vast Case: बुडत्याचा पाय खोलात! तन्वी वस्तचा आणखी एक कारनामा, फ्रॉडच्या तिसऱ्या प्रकरणात पुन्‍हा अटक

Tanvi Vast Arrested: ठकसेन तन्‍वी वस्‍त आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा व्‍यवस्‍थापक आनंद जाधव यांचे नवनवे कारनामे उघडकीस येऊ लागले आहेत.
Goa Fraud Case: तन्वी वस्तचा आणखी एक कारनामा उघड! पैसे काढून ग्राहकांना दिल्या खोट्या पावत्‍या; तिसऱ्या प्रकरणात पुन्‍हा अटक
Tanvi Wast ArrestedDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: नेट-बँकिंग कळत नसल्‍याचा फायदा उठवून ज्येष्ठ नागरिकांना लुटणारी ठकसेन तन्‍वी वस्‍त आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियाचा व्‍यवस्‍थापक आनंद जाधव यांचे नवनवे कारनामे उघडकीस येऊ लागले आहेत. या दाेघांनी ग्राहकांच्‍या कायमस्वरूपी ठेवीतील रक्‍कम काढून घेऊन त्‍या ग्राहकांना तुमच्‍या ठेवींची मुदत वाढवून दिली, असे सांगणाऱ्या खोट्या पावत्‍या दिल्‍याचे उघड झाले आहे.

या घोटाळ्यांपैकी एका प्रकरणात तन्‍वी वस्‍तला केपे न्‍यायालयाने जामीन मंजूर केल्‍यानंतर कुडचडे पोलिसांनी आता तिसऱ्या प्रक़रणात तन्‍वीला पुन्‍हा ताब्‍यात घेतले आहे. दुसरीकडे आनंद जाधव याने मडगावच्‍या सत्र न्‍यायालयात (Court) जामिनासाठी केलेल्‍या अर्जावर अतिरिक्‍त सत्र न्‍यायाधीश पूजा कवळेकर यांच्‍यासमाेर आज सुनावणी पूर्ण झाली. या जामीन अर्जावरील निर्णय शुक्रवारपर्यंत राखून ठेवला आहे.

कुडचडे पोलिस या प्रक़रणाचा तपास करीत असून कायम ठेवींच्‍या खोट्या पावत्‍या या दाेन्‍ही संशयितांनी ग्राहकांना (Customers) दिल्‍याची एकूण चार प्रक़रणे पुढे आली आहेत. या कायम ठेवीतील रक्‍कम प्रत्‍यक्षात तन्‍वीच्‍या बँक खात्‍यात वळविण्‍यात आली असून ग्राहकांना मात्र तुमच्‍या कायम ठेवी पुढे चालू ठेवल्‍या आहेत, अशा आशयाचा मजकूर लिहिलेल्‍या पावत्‍या दिल्‍या गेल्‍या, असे दिसून आले आहे.

Goa Fraud Case: तन्वी वस्तचा आणखी एक कारनामा उघड! पैसे काढून ग्राहकांना दिल्या खोट्या पावत्‍या; तिसऱ्या प्रकरणात पुन्‍हा अटक
Goa Fraud Case: गोमंतकीयांना कोट्यवधींचा चुना लावणाऱ्या मायरन रॉड्रिग्जच्या पहिल्या पत्नीला अटक

एकूण ३२ तक्रारी; दोन कोटी रुपयांना गंडा

तन्‍वी आणि जाधव विरोधात एकूण ३२ तक्रारी दाखल झाल्‍या असून फसवणुकीची एकूण रक्कम दीड ते दोन काेटींच्‍या आसपास असण्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त केली जाते. जाधव हा सध्‍या न्‍यायालयीन कोठडीत असून तन्‍वीला पोलिसांनी पुन्‍हा एकदा ताब्‍यात घेतले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com