Vijay Sardesai
Vijay SardesaiDainik gomantak

Vijai Sardesai : गोवा सरकारच्या नव्या जेटी धोरणाला आक्षेप; विजय सरदेसाईंचं निवेदन

जेटींचे नियंत्रण बंदर कप्तान खात्याच्या अखत्यारीत असणे गरजेचे असल्याचंही सरदेसाई यांचं मत
Published on

Vijai Sardesai : राज्यातील जेटी आणि होड्यांची वाहतूक बंदर आणि कप्तान खात्याच्याच अखत्यारीत असणे आवश्यक असल्याचे स्पष्ट मत गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी व्यक्त केले. गोवा सरकारच्या नव्या जेटी धोरणाला आक्षेप घेणारे आपले सविस्तर निवेदन आज सोमवारी त्यांनी सादर केले आहे.

गोवा सरकारच्या जेटी धोरणाला विरोध करताना सरदेसाई यांनी या धोरणात कुठल्याही रोजगाराच्या संधी नाहीत याकडे लक्ष वेधले आहे. हे धोरण गोवा पर्यटन विकास महामंडळाकडून तयार केले गेले आहे. याकडे लक्ष वेधताना धोरणे तयार करणे हे महामंडळाचे काम नाही, पर्यटन क्षेत्रात पायाभूत सुविधा उपलब्ध करणे आणि राज्यांतील पर्यटनाचा प्रसार ही या महामंडळाची मुख्य कामे आहेत याकडे त्यांनी प्रकाशझोत टाकला आहे.

Vijay Sardesai
Ravi Naik : मद्यनिर्मिती प्रकल्पाचे दूषित पाणी ओहोळात सोडल्याने रवी नाईक संतापले

या जेटी धोरणात स्थानिकांनाच रोजगार देण्याची कोणतीही तरतूद नाही. उलट हे धोरण म्हणजे काही खासगी कंपन्यांना गोव्याची किनारपट्टी आंदण देण्याचा प्रकार वाटत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सरकारला जर स्थानिकांच्या रोजगाराचे खरेच पडून गेलेले आहे तर या धोरणात स्थानिकांना 80 टक्के रोजगाराच्या संधी ही अट समाविष्ट करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

जेटी व्यवस्थापन समितीची या धोरणात जी तरतूद केली आहे तिलाही सरदेसाई यांनी आक्षेप घेताना जेटीचे व्यवस्थापन बंदर कप्तान खात्याकडेच असण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com