Goa Forward Party | Vijai Sardesai
Goa Forward Party | Vijai SardesaiDainik gomantak

विधानसभेत तुमचा प्रश्न मांडला जावा असे वाटते का? गोवा फॉरवर्डने प्रसिद्ध केला मेल आणि मोबाईल नंबर

30 जूनपर्यंत प्रश्न पाठवण्याची अंतिम मुदत : दिलीप प्रभुदेसाई
Published on

गोवा फॉरवर्ड पार्टीने पक्षाला सार्वजनिक समस्यांचे प्रश्न आणि तपशील देण्यासाठी आज ईमेल आयडी आणि व्हॉट्सअॅप क्रमांक सुरू केला. येत्या विधानसभा अधिवेशनात पक्ष या उपक्रमामार्फत जनतेचे मुद्दे उपस्थित करणार आहे.

गोवा फॉरवर्ड पार्टीचे वरिष्ठ उपाध्यक्ष दिलीप प्रभुदेसाई यांनी 30 जूनपर्यंत प्रश्न पाठवण्याची अंतिम मुदत दिली आहे.

Goa Forward Party | Vijai Sardesai
अक्षय उर्जेबाबत धोरण बनवणारे गोवा पहिले राज्य : मुख्यमंत्री डॉ. सावंत

पणजी येथे आयोजित पत्रकार परिषदेत गोवा फॉरवर्ड पार्टीचे वरिष्ठ उपाध्यक्ष दिलीप प्रभुदेसाई यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, पक्षाने '८४८४८७७०४२' हा हेल्पलाईन क्रमांक आणि 'publicsuggestions@goaforward.in' हा ई-मेल सुरू केला आहे.

प्रभुदेसाई म्हणाले की, गोव्यातील जनता त्यांचे प्रश्न आणि मुद्दे गोवा फॉरवर्ड पक्षाला देण्यास मोकळे आहेत जे आगामी विधानसभा अधिवेशनात उपस्थित केले जातील.

Goa Forward Party | Vijai Sardesai
Vasco Crime News : वास्कोतील युवतीला तब्बल अडीच लाख रुपयांना गंडा; महिलेविरुध्द गुन्हा नोंद

ते पुढे म्हणाले की, विधानसभेच्या १८ दिवसांच्या अधिवेशनात मुद्दे मांडण्यास, विविध विषयांवर चर्चा करण्यास चांगला वाव मिळेल ज्याचा जनतेला फायदा होईल. लोकसभेच्या अधिवेशनात जे सार्वजनिक प्रश्न मांडायचे आहेत ते सर्व या ईमेल आयडी आणि हेल्पलाइन नंबरद्वारे जीएफपी वर यावेत अशी पक्षाची इच्छा आहे.

नंतर, गोवा फॉरवर्ड पार्टीचे ज्येष्ठ नेते प्रशांत नाईक यांनी गोव्यातील विविध स्वयंसेवी संस्थांसह लोकांना त्यांचे प्रश्न तसेच त्यांना विधानसभेच्या अधिवेशनात मांडावयाच्या विषयाचे काही तपशील देण्याची विनंती केली. असं केल्यास अधिवेशनात योग्य चर्चा आणि समस्येचे प्रतिनिधित्व सुनिश्चित करता येईल असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com