पणजी: राज्यात कोरोनाकाळात कोरोना योद्ध्यांची (Covid 19 Warrior) भूमिका बजावलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना 20 टक्के जादा वेतनात वाढ देण्याची घोषणा सरकारने केली असली, तरी त्याला सरकारकडून मान्यता देण्यात आली नसल्याचे माहिती हक्क कायद्याखाली (RTI) उघड झाली आहे. या कोरोना योद्ध्यांचा सत्कार करून त्यांची फसवणूक चालविली आहे, असा आरोप गोवा फॉरवर्ड (Goa Forward Part) पक्षाने केला आहे. (Goa Forward Party has accused the Goa government of betraying the Covid19 warriors)
पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना पक्षाचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत म्हणाले की, सरकारने कोविड संबंधित कोरोना योद्धे व प्रशासकीय तसेच तांत्रिक कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेतनात जादा 20 टक्के वाढ देण्याची घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली होती. मात्र, या घोषणेनंतर आवश्यक असलेली प्रक्रिया त्यांनी केली नव्हती, असे उघड झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
तिसऱ्या लाटेबाबत सज्जता नाहीच
राज्यात अजूनही कोरोना संसर्ग आहे. कोरोना संसर्गाची दुसरी लाटेचे प्रमाण कमी झाले असले तरी तिसरी लाट येण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत सरकारने मडगाव येथील ‘ईएसआय’ कोविड इस्पितळाची अधिसूचना रद्द केली आहे. यावरून सरकारचे प्रशासन तळागाळाला गेल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.