Goa Election: भाजपचा पराभव करण्यासाठी GFP करणार इतर पक्षांशी युती

आम्ही कायमचे निष्क्रिय राहू शकत नाही आणि इतरांच्या अकार्यक्षमतेमुळे आणि निर्णयक्षमतेच्या अभावामुळे वेळ वाया जात आहे तो आम्ही वाया घालवू शकत नाही." -सरदेसाई
Goa Forward Party chief Vijai Sardesai will ally with other political parties
Goa Forward Party chief Vijai Sardesai will ally with other political partiesTwitter/ @VijaiSardesai
Published on
Updated on

2022 च्या गोवा विधानसभा निवडणुकीच्या (Goa Assembly Election) अगोदर गोवा फॉरवर्ड पार्टी (GFP) चे प्रमुख विजय सरदेसाई(Vijai Sardesai) यांनी मोठा खुलासा केला आहे. त्यांचा GFP पक्ष सत्ताधारी भाजपचा (BJP) सामना करण्यासाठी इतर राजकीय पंक्षाशी युती करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दक्षिण गोवा (South Goa) जिल्ह्यातील फातोर्डा (Fatorda) मतदारसंघातील एका मेळाव्याला संबोधित करताना GFP दिवाळीपर्यंत इतर पक्षांसोबत युती करेल, असेही सरदेसाई यांनी सांगितले.

निवडणूकीपूर्वी गोवा फॉरवर्ड पक्षासोबत युती न केल्याबद्दल राज्यातील मुख्य विरोधक असलेल्या काँग्रेस पक्षावरही त्यांनी टीका केली. सरदेसाई यांनी दावा केला की, गेल्या दोन वर्षांपासून ते भाजपला आव्हान देण्यासाठी आणि पराभूत करण्यासाठी एकत्रित येवून 'टीम गोवा' स्थापन करण्याची गरज आहे असे सांगत होते.

Goa Forward Party chief Vijai Sardesai will ally with other political parties
टोळीयुद्धे, वारंवार गुन्हे राज्याची प्रतिमा नष्ट करतात; विजय सरदेसाई

आम्ही कायमचे निष्क्रिय राहू शकत नाही आणि इतरांच्या अकार्यक्षमतेमुळे आणि निर्णयक्षमतेच्या अभावामुळे वेळ वाया जात आहे तो आम्ही वाया घालवू शकत नाही."

-सरदेसाई

40 सदस्यीय गोवा विधानसभेत सरदेसाई यांच्या GFP चे तीन आमदार आहेत. भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते मनोहर पर्रीकर यांना राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी GFP पक्षाने पाठिंबा दिला होता. मात्र 2019 मध्ये, पर्रीकर यांच्या मृत्यूनंतर, GFP मंत्र्यांना विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळातून वगळण्यात आले. या वर्षाच्या सुरुवातीला, GFP ने भाजप नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) देखील सोडली.

Goa Forward Party chief Vijai Sardesai will ally with other political parties
Goa Election: काँग्रेस-तृणमूलमध्ये वादाची ठिणगी, युतीची शक्यता धूसर

2022 च्या निवडणुकीपूर्वी गोवा फॉरवर्ड पार्टीने एनडीए सोडली

केंद्रीय गृहमंत्री आणि एनडीएचे अध्यक्ष अमित शहा यांना लिहिलेल्या पत्रात विजय सरदेसाई यांनी म्हटले होते की, त्यांचा पक्ष युतीतून माघार घेत आहे. सरदेसाई यांच्या मते, एनडीए सोडण्याचा पक्षाचा निर्णय सर्वानुमते होता. याशिवाय, प्रमोद सावंत यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर गोव्यातील भाजप सरकार भ्रष्टाचार आणि अप्रामाणिकपणामध्ये गुंतले आहे, असा आरोपही त्यांनी केला. सरदेसाई यांनी गोव्यातील बेरोजगारी, शिक्षण यासारख्या अनेक मुद्द्यांवरही प्रकाश टाकला. त्याचबरोबर गोव्यात कोविड -19 प्रकरणांच्या वाढत्या संख्येसाठी त्यांनी भाजपवरही हल्लाबोल केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com