पणजी : विधानसभा अधिवेशनात गोवा फॉरवर्डचा एकमेव आमदार असूनही सामान्य जनतेच्या समस्या मांडून एकहाती लढत आमदार विजय सरदेसाई यांनी दिली आहे. मात्र, इतर विरोधकांची भूमिका संशयास्पद होती ती गोमंतकीयांनी शोधून काढण्याची गरज आहे, अशी टीका पक्षाचे सरचिटणीस मोहनदास लोलयेकर यांनी केली.
पणजीतील गोवा फॉरवर्ड कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेवेळी पक्षाचे नेते संतोष सावंत आणि दीपक कळंगुटकर उपस्थित होते. विरोधकांमध्येच फूट पडल्याने विधानसभेत आक्रमक भूमिका घेऊन विषय मांडण्यात त्यांचे आमदार कमी पडले. सरकारी तिजोरीत खडखडाट झाल्याने इलेक्ट्रिक वाहनांसाठीचे अनुदान बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला, असे मत लोलयेकर यांनी व्यक्त केले.
यावेळी दीपक कळंगुटकर म्हणाले, विरोधकाची भूमिका ठामपणे मांडण्यास राष्ट्रीय पक्ष नव्हे, तर प्रादेशिक पक्षही सक्षम आहेत हे गोवा फॉरवर्ड पक्षाच्या एकमेव आमदारांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे या पक्षाचे बळ वाढवण्यासाठी युवकांनी पुढे यावे, असे आवाहन कळंगुटकर यांनी केले.
आकडेवारी फक्त कागदावरच
यावेळी लोलयेकर म्हणाले की, आमदार सरदेसाई यांनी अटल सेतू पुलावरील दिव्यांचे खांब, झुआरी जमीन रूपांतरण, आयडीसी जमीन हस्तांतरण असे अनेक घोटाळे चव्हाट्यावर आणले. तसेच अर्थसंकल्पही घोटाळेबाज असल्याचा पर्दाफाश केला. इलेक्ट्रिक वाहनांसाठी अनुदान ठेवूनही ही योजना बंद केली, त्यावरून अर्थसंकल्पातील आकडेवारी फक्त कागदावरच आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.