चर्चिल आलेमाव यांच्या भावांविरुद्धचे सोने तस्करी प्रकरण येणार रुपेरी पडद्यावर, नवाज साकारणार महत्वाची भूमिका

कोस्टा यांनी 1979 मध्ये गोवा कस्टम्समधून अधिकारी म्हणून काम सुरू केले होते.
Nawazuddin Siddiqui New Film
Nawazuddin Siddiqui New FilmDainik Gomantak
Published on
Updated on

Nawazuddin Siddiqui New Film: अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने कस्टम अधिकारी कोस्टा फर्नांडिस यांच्या जीवनावर आधारित चित्रपट साइन केला आहे. सीमाशुल्क विभागाच्या अधिकृत वेबसाइटनुसार, कोस्टा यांनी 1979 मध्ये गोवा कस्टम्समधून अधिकारी म्हणून काम सुरू केले होते.

कोस्टा फर्नांडिस यांनी 1991 मध्ये गोव्याचे माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव आणि त्यांच्या भावांविरुद्ध सोन्याच्या तस्करीचे प्रकरण उघडकीस आणले होते. सेजल शाहच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या या चित्रपटाच्या शूटिंगला 26 ऑक्टोबरपासून मुंबईत सुरुवात झाली.

पहिल्या शेड्यूलमध्ये नवाज आणि मराठी अभिनेत्री प्रिया बापट यांच्यासोबत काही नाट्यमय दृश्ये शूट करण्यात आली. चित्रपटात नवाजुद्दीन अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसत आहे.

सध्या, चित्रपटाची टीम गोव्यात चित्रपटाच्या दुसऱ्या शेड्यूलचे शूटिंग करत आहे. या शेड्यूलमध्ये नवाजुद्दीनसोबत काही अ‍ॅक्शन आणि चेस सीन शूट केले जात आहेत.

डिसेंबर अखेरपर्यंत चित्रपटाची टीम गोव्यात शूटिंग करणार आहे. त्यानंतर टीम चित्रपटाचे अंतिम शेड्यूल मुंबईत शूट करणार आहे. रिअल लाईफवर आधारित किंवा त्यांच्यापासून प्रेरित नवाजचा हा चौथा चित्रपट आहे.

यापूर्वी नवाजुद्दीन सिद्दीकीने मांझी, मंटो आणि ठाकरे या चित्रपटात अशा भूमिका साकारल्या होत्या. याशिवाय नवाजुद्दीन सेक्शन 108 आणि मार्वलस या चित्रपटात देखील दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com