Vishwajit Rane: जंगलातील आगींबद्दल प्रशासन सतर्क; फॉरेस्ट टीमसह ट्रेकर्सना प्रशिक्षण, ड्रोनचाही उपयोग करणार

Vishwajit Rane: यापुढे अभयारण्यात वणवे लागणार याची काळजी घेतली जाणार
Forest Minister Vishwajit Rane
Forest Minister Vishwajit Rane Dainik Gomantak

Vishwajit Rane: 'यापुढे अभयारण्य क्षेत्र किंवा इतर जंगलात आग लागणार नाही याची काळजी घेतली जाणार असून आगीचा वणवा विझविण्यासाठी फॉरेस्ट टीम सोबतच ट्रेकर्सना प्रशिक्षण देऊन जास्ती जास्त मनुष्य बळ तयार केले जाणार असल्याची माहिती वनमंत्री विश्वजित राणे यांनी दिलीय. वनखात्यातर्फे वाळपई वन प्रशिक्षण केंद्र आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.

Forest Minister Vishwajit Rane
Chikhli Fuel Leak : चिखली परिसरात इंधन गळती सुरूच ! कंपनी, प्रशासनाची अनास्था

आज आग विझविण्यासाठी ड्रोनचा सुध्दा उपयोग केला जाऊ शकतो त्यामुळे एका वेगळ्या प्रकारे नियोजन व विचार करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन वनमंत्री विश्वजित राणे यांनी वनखात्यातर्फे वाळपई वन प्रशिक्षण केंद्र येथे जंगलात आग विझविण्यासाठी देण्यात आलेल्या खास प्रशिक्षणार्थींना प्रशस्तीपत्र तसेच किट्सच्या वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना केले.

एकूण 150 ट्रेकर्स व 40 फोरेस्ट गार्ड मिळून 190 जणांना प्रशिक्षण कार्यशाळा आयोजीत केली होती. यावेळी आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थांना प्रशस्तिपत्र तसेच किड्सचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर वन खात्याचे मुख्य वनसंरक्षक प्रवीण कुमार राघव, वन खात्याच्या उपवनसंरक्षक तेजस्वीनी पुसुलुरी, वनसंरक्षक यशोदा के आदींची उपस्थिती होती.

मागच्या वर्षी गोव्यात जंगलांना आगी लागण्याचे प्रकार घडले होते. म्हादई पाणी वाटपाचा मुद्दा ऐरणीवर असताना म्हादई खोऱ्यात आणि अभयारण्यात मोठ्या प्रमाणात आगी लावल्या गेल्या होत्या.

त्यावेळी वन विभागानेदेखील या आगी नैसर्गिक नसून मानवनिर्मित असल्याचे सांगितले होते. तसेच वनमंत्र्यांनी देखील आग लावणाऱ्याची हयगय केली जाणार नसल्याचा इशारा दिला होता.

पुढील काही महिन्यात उन्हाळा सुरु होंणार असून मागील वर्षीच्या घटनांचा धोका लक्षात घेता. सरकारने हे महत्वाचे पाऊल उचलल्याचे बोललं जातंय.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com