Goa Forensic Lab: ..गुन्हेगारांची खैर नाही! गोव्यात ‘लाय डिटेक्टर’सह ‘पॉलिग्राफी’ चाचणी; संशयितांची चौकशी होणार अधिक अचूक

Goa Lie Detector and Polygraph: ‘लाय डिटेक्टर’ म्हणजे अशी उपकरणाधारित चाचणी, जी व्यक्तीच्या शरीरातील शारीरिक बदलांच्या आधारे तो खरे बोलतो की खोटे, हे ओळखते.
Goa lie detector test, Goa polygraph test
Goa lie detector test, Goa polygraph testDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यातील गुन्हे अन्वेषण प्रक्रियेला आता अधिक वैज्ञानिक बळ मिळणार आहे. गोवा सरकारने वेर्णा येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत ‘लाय डिटेक्टर’ (खोटेपणा ओळखणारी चाचणी) आणि ‘पॉलिग्राफी’ (आवाज विश्लेषण चाचणी) या दोन्ही अत्याधुनिक सुविधा सुरू करण्याची तयारी केली आहे.

न्यायवैद्यक खात्याचे संचालक डॉ. आशुतोष आपटे यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, लाय डिटेक्टर विभागाची सुरुवात चाचणी स्वरूपात करण्यात आली असून पुढील महिन्याभरात तो पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल. आतापर्यंत अशा तपासणीसाठी संशयितांना महाराष्ट्र वा कर्नाटकातील प्रयोगशाळांमध्ये पाठवावे लागत होते. या नव्या सुविधेमुळे संशयिताच्या सत्य-असत्य विधानांची तपासणी राज्यातच होणार आहे.

Goa lie detector test, Goa polygraph test
Goa Crime: बागा बीचवरील 'तो' व्हिडिओ व्हायरल झाला अन् पोलिसांनी सूत्रे हलवली! तरुणीची छेड काढणारा राजस्थानचा 23 वर्षीय तरुण गजाआड

‘लाय डिटेक्टर’ म्हणजे काय?

‘लाय डिटेक्टर’ म्हणजे अशी उपकरणाधारित चाचणी, जी व्यक्तीच्या शरीरातील शारीरिक बदलांच्या आधारे तो खरे बोलतो की खोटे, हे ओळखते. चाचणीदरम्यान संशयिताच्या शरीराला विशिष्ट उपकरणे जोडली जातात, जी हृदयगती, रक्तदाब, श्वसनाचे प्रमाण आणि घामग्रंथींची प्रतिक्रिया यांचा मागोवा घेतात. जेव्हा व्यक्ती खोटे बोलते, तेव्हा शरीरात सूक्ष्म बदल होतात आणि त्यावरून तपासक निष्कर्ष काढतात.

Goa lie detector test, Goa polygraph test
Goa Crime: सावत्र बाप निघाला 'नराधम'! 20 महिने अल्पवयीन मुलाचा लैंगिक छळ; दिली जीवे मारण्याची धमकी

पॉलिग्राफी चाचणी म्हणजे काय?

पॉलिग्राफी म्हणजे आवाजाच्या नमुन्यांचे वैज्ञानिक विश्लेषण करणारी पद्धत. संशयिताचा आवाज आणि गुन्ह्याच्या ठिकाणी मिळालेल्या आवाजाचा नमुना यांची तुलना करून तीच व्यक्ती आहे का, हे निश्चित केले जाते. न्यायवैद्यक प्रयोगशाळेत येत्या महिन्यात हा विभागही कार्यान्वित होईल. आतापर्यंत अशी तपासणी राज्याबाहेरील प्रयोगशाळांकडे पाठवावी लागत असे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com