Goa Football Association Election : चर्चिल आलेमाव यांच्या फुटबॉल वर्चस्वाला जोरदार धक्का

जीएफए निवडणुकीत पुत्र सावियो आलेमाव पराभूत; कायतान होणार नवे अध्यक्ष
Goa Football Association Election 
| Caitano Fernandes
Goa Football Association Election | Caitano Fernandes Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Football Association Election : उद्योजक कायतान जुझे फर्नांडिस गोवा फुटबॉल असोसिएशनच्या (जीएफए) निवडणुकीत रविवारी अध्यक्षपदी दणदणीत फरकाने निवडून आले. त्यामुळे माजी मुख्यमंत्री, फुटबॉलमधील दिग्गज चर्चिल आलेमाव यांच्या वर्चस्वाला जबर धक्का बसला. त्यांचे पुत्र व्हालेन सावियो आलेमाव पराभूत झाले.

कायतान फर्नांडिस यांनी 36 मतफरकाने विजय मिळविला. अध्यक्षपदासाठी त्यांना 83, तर सावियो यांना 47 मते मिळाली. अध्यक्षपदाचे तिसरे उमेदवार वेल्विन मिनेझिस यांना 29 मते मिळाली. निवडणुकीत मतदानास पात्र सर्व 159 क्लबांनी मतदानाचा हक्क बजावला. जीएफएच्या 21 सदस्यीय कार्यकारी समितीत अध्यक्ष कायतान यांच्यासह त्यांच्या गटातील एकूण 18 जण निवडून आले, तर विरोधकांना फक्त सदस्यपदाच्या तीनच जागा मिळाल्या. तिसवाडी विभागातील चारही सदस्य बिनविरोध होते, त्यापैकी तिघे कायतान गटाचे आहेत.

कायतान यांच्या गटाचा वरचष्मा

उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत दोन्ही जागांवर कायतान यांच्या गटातील उमेदवार निवडून आले. कायतान यांचे खंदे समर्थक जोनाथन डिसोझा उत्तर विभागीय उपाध्यक्षपदी विजयी झाले. जोनाथन यांना 39 मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी डॉमनिक परेरा यांना 23, तर व्हिक्टर फर्नांडिस यांना 15 मते मिळाली. दक्षिण विभागीय उपाध्यक्षपदी अँथनी पांगो विजयी ठरले. त्यांनी पोलिस अधिकारी फिलोमेनो कॉस्ता यांचा 44-38 मतफरकाने पराभव केला. मावळत्या समितीत पांगो उपाध्यक्ष होते व चर्चिल आलेमाव यांच्या राजीनाम्यानंतर ते संघटनेच्या प्रभारी अध्यक्षपदी होते. सदस्यपदी बार्देशात पाचही, सासष्टीत सहा, तिसवाडीत तीन, तर मुरगावात एक जागा कायतान गटाला मिळाली.

Goa Football Association Election 
| Caitano Fernandes
Goa Karnataka Water Conflict : कोर्टाला झुगारून पाणी पळवण्याच्या कर्नाटकचा प्रयत्न

आलेमाव कुटुंबाला प्रथमच धक्का

जीएफए निवडणुकीत आलेमाव कुटुंबातील सदस्याला प्रथमच पराभवाचा सामना करावा लागला. यापूर्वी चर्चिल यांचे बंधू ज्योकिम यांनी जीएफए अध्यक्षपद भूषविले आहे, तर 2018-2022 या कालावधीसाठी स्वतः चर्चिल जीएफए अध्यक्ष होते. वयाची सत्तर वर्षे पूर्ण केल्यामुळे ते अपात्र ठरले आणि सप्टेंबरच्या प्रारंभी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाच्या आदेशानुसार त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. चर्चिल यांची कन्या वालंका आलेमाव या अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या सदस्य आहेत.

गोव्यातील फुटबॉलला आता ‘भिवपाची गरज ना.’ येत्या सहा महिन्यांत राज्य खेळात सकारात्मक बदल दिसतील. आम्ही सर्वांच्या विश्‍वासास पात्र ठरू. काही महिन्यांपूर्वीच आम्ही निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी केली होती. सर्व योजनांची कार्यवाही करण्यासाठी प्रयत्नशील राहू, असा दावा नवनिर्वाचित जीएफए अध्यक्ष कायतान फर्नांडिस यांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com