Spices Plantation in Goa: गोव्याची खाद्यसंस्कृती; राज्यात 266 हेक्टर क्षेत्रात मसाल्यांची झाडे

गोव्याच्या खाद्यसंस्कृतीत मसाल्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे
Spices Plantation in Goa
Spices Plantation in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Spices Plantation in Goa: गोव्याच्या खाद्यसंस्कृतीत मसाल्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. शाकाहार, मांसाहार किंवा प्रामुख्याने मत्स्याहार बनवायचा असेल तर सर्व प्रकारच्या पदार्थांमध्ये मसाला हा हवाच! त्यात जर तो घरगुती मसाला असेल तर पदार्थांना येणारी चवच न्यारी असते.

Spices Plantation in Goa
First Aid Training: प्रथमोपचारक व्हा, प्राण वाचवा; मंत्री विश्‍वजीत राणे

राज्यातील सर्व तालुक्यात मसाल्यांचे उत्पन्न घेतले जाते. गोवा कृषी खात्याच्या २०२२-२३ वर्षाच्या आकडेवारीनुसार राज्यात एकूण २६६ हेक्टर क्षेत्रफळात मसाल्यांच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे. या मसाल्यांच्या झाडामध्ये तिखी, मिरी, जायफळ, हळद आले तसेच इतर मसाले झाडांचा समावेश आहे.

सांगेत सर्वाधिक क्षेत्र : उत्तर गोव्यात ९५ हेक्टर तर दक्षिण गोव्यात १७१ हेक्टर क्षेत्रफळात मसाल्यांच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे. सांगे तालुक्यात सर्वाधिक म्हणजे ८० हेक्टर क्षेत्रफळात मसाला झाडांची लागवड करण्यात येते. सर्वात कमी लागवड ही मुरगाव तालुक्यात केली जाते. केवळ १ हेक्टर क्षेत्रफळात ही झाडे लावण्यात आली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com