Flight Bomb Threat: विमान हवेत असतानाच मिळाली बॉम्ब धमकी; गोव्यातून कोलकताला जाणाऱ्या फ्लाईटचे हैदराबादमध्ये इमर्जन्सी लॅडिंग

Flight Bomb Threat: बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर दुपारी ४ वाजून ४० मिनिटांनी हैदराबाद विमानतळावर लँड करण्यात आले.
Flight Bomb Threat: विमान हवेत असतानाच मिळाली बॉम्ब धमकी; गोव्यातून कोलकताला जाणाऱ्या फ्लाईटचे हैदराबादमध्ये इमर्जन्सी लॅडिंग
Goa FlightDainik Gomantak
Published on
Updated on

दाबोळी: गोव्यातून कोलकत्ताला जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्यानंतर विमान हैदराबाद येथे वळवण्यात आले. दाबोळी विमानतळावरुन आज (०२ नोव्हेंबर) दुपारी साडे तीन वाजता उड्डाण घेतलेले विमान कोलकत्ता येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँड होणार होते. दरम्यान, हवेत असतानाच मिळालेल्या बॉम्बच्या धमकीनंतर विमान हैदराबाद विमानतळावर वळवण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, इंडिगोचे ६ई १६२ एअरबस ए३२० विमानाने दाबोळी विमानतळावरुन उड्डाण घेतले. बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर दुपारी ४ वाजून ४० मिनिटांनी हैदराबाद विमानतळावर लँड करण्यात आले. विमानाने उड्डाण केल्यानंतर ३० मिनिटांनी फ्लाईट सुरक्षेच्या कारणास्तव हैदराबाद विमानतळावर उतरवले जात असल्याची माहिती पायलटने प्रवाशांना दिली.

प्रोटोकॉलनुसार, विमानाचे आपत्कालिन लँडिंग हैदराबाद विमानतळावर करण्यात आले. CISF जवानांनी कडक सुरक्षेत प्रवाशांना खाली उतरवले. प्रवासी उतरल्यानंतर विमानाची तपासणी करण्यात आली. तसेच, प्रवाशांना मुख्य टर्मिनलपर्यंत एक्सकॉर्ट करण्यात आले.

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी इंडिगोच्या वतीने सायंकाळी सात वाजता दुसऱ्या फ्लाईटची सोय करण्यात आली. सुरक्षा यंत्रणानी केलेल्या कसून तपासणीनंतर बॉम्बची धमकी खोटी असल्याची माहिती उघड झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com