Goa Fishining : गतवर्षी मासेमारी १२ टक्क्यांनी घटली; १४ हजार टनांची तूट

Goa Fishining : २०२३-२४ मध्ये ट्रॉलर्सद्वारे पकडलेली मासळी १ लाख २६ हजार टन
fishing
fishingDainik Gomantak

Goa Fishining :

पणजी, राज्यात अधिसूचित करण्यात आलेल्या ७ मासेमारी धक्क्यांपैकी ५ ठिकाणी गेल्या आर्थिक वर्षात (२०२३ - २४) मासेमारी ट्रॉलर्सनी पकडलेल्या मासळीचे प्रमाण १ लाख २६ हजार १२० टन आहे.

त्यातील मरिन समुद्रातील प्रमाण १.१७ लाख टन आहे तर अंतर्देशीय पाण्यामधील प्रमाण ८,६५१ टन आहे. हे प्रमाण मागील आर्थिक वर्षापेक्षा सुमारे १४ हजार टन कमी म्हणजेच १२ टक्क्यांनी घटले आहे.

१ जूनपासून सुरू होत असून सर्व धक्के सील करण्याची अधिसूचना मत्स्य खात्याने जारी केली आहे.

दरवर्षी मोठी, मध्यम व लहान आकाराच्या सुंगट्याचे प्रमाण इतर माशांच्या तुलनेत अधिक असते. त्यापाठोपाठ बांगडे, तार्ले तसेच पापलेट व सरंगे या माशांचे प्रमाणही यावर्षी कमी नोंद झाले आहे.

fishing
Goa Police: तंत्रज्ञानामुळे गुन्ह्यांच्या तपासाला मिळेल गती; नव्या फौजदारी कायद्यांबाबत पणजीत पत्रकारांसाठी कार्यशाळा

सुंगटे, बांगडे तसेच सुरमई या माशांचे प्रमाण घटले आहे. कार्यरत असलेल्या मालिम,कुटबण व वास्को या मासेमारी धक्क्यांवर सर्वाधिक नोंद झाली आहे. दोन महिने मासेमारी बंदीकाळ येत्या

राज्यात मासळी पकडण्याचे प्रमाण यावर्षीही घटले आहे. मरिन समुद्रात पकडण्यात आलेल्या कोळंबीचे प्रमाण गेल्या आर्थिक वर्षात ३९५९ टन होते व त्याची किंमत सुमारे १९० कोटी होती. ट्रॉलर्स हे मरिन पाण्यात मासेमारी करण्यासाठी जात असल्याने अंतर्देशीय पाण्यात पकडण्यात आलेल्या माशांचे प्रमाण वीसपटीने आहे. २०२२ - २३ या काळात बांगडे व तार्लेचे प्रमाण अनुक्रमे ५५,८४३ टन व २३,७१९ टन होते. मागील आर्थिक वर्षात (२०२३ - २४) ते दहा टक्क्याने घटले आहे.

राज्यात विविध प्रकारच्या यांत्रिकी बोटी, पर्ससिनर बोटी व होड्या मिळून सुमारे ३०९३ बोटींची नोंद झाली आहे. त्यामध्ये बिगर यांत्रिकी होड्या ३१३, यांत्रिकी होड्या १९१४, ट्रॉलर्स ४४२, पर्ससिनर बोटी ३४४, ट्रॉलर्स कम पर्ससिनर बोटी ६२ याचा समावेश आहे. याव्यतिरिक्त क्रीडा मासेमारी बोटी १७ आहेत. मच्छिमारी खात्याकडे एकमेव गस्ती नौका आहे. या एका नौकेमार्फत समुद्रातील बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्या बोटींवर देखरेख ठेवली जाते.

मासेमारी बंदीची अधिसूचना जारी

येत्या १ जून ते ३१ जुलै या दोन महिन्याच्या मासेमारी बंदीकाळाची अधिसूचना जारी करण्यात आली असून त्याची प्रत जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आली आहे. राज्यातील मासेमारी धक्क्यांवरील डिझेल पंप ३१ मे रोजी सील करण्यात येतील. मामलेदारांनी ही प्रक्रिया पूर्ण करून त्याचा अहवाल खात्याला सादर करायचा आहे.

समुद्र खवळलेला असणार असल्याने सर्व बोटीना मासेमारीसाठी न जाण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. होड्यानी तसेच ९.९ एचपी क्षमतेच्या यांत्रिकी होड्यांना अंतर्देशीय पाण्यात मच्छिमारी करण्यास नियमानुसार परवानगी आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com