Goa First NGO: राहुल देसाई यांना मुरगाव मामलेदार पदावरून हटवावे

जमीन घोटाळ्यातून दोष मुक्त होत नाही
 land scam
land scamDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: मुरगाव तालुक्याचे संयुक्त मामलेदार म्हणून राहुल देसाई यांच्या नियुक्तीबद्दल गोवा फर्स्ट या बिगर सरकारी संस्थेचे अध्यक्ष परशुराम सोनुर्लेकर यांनी आक्षेप घेतला असून, जोपर्यंत देसाई जमीन घोटाळ्यातून दोषमुक्त होत नाही तोपर्यंत त्यांना मुरगाव तालुका कार्यालयातून तात्काळ मामलेदार पदावरून हटवावे. तसेच आरोपमुक्त होत नाही तोपर्यंत त्यांना गोव्यात कुठेही त्याची वर्णी लावू नये अशी मागणी केली आहे.

(Goa First NGO said Rahul Desai removed from the post at Mormugao mamledar)

 land scam
Rescue Operation: समुद्रात बुडणाऱ्या जहाजातून 19 खलाशांची तटरक्षक दलाने केली सुटका

जमीन हडप प्रकरणानंतर सर्व तालुक्यातील मामलेदार व संयुक्त मामलेदारांच्या बदलीचा आदेश सरकारने काढला आहे. दरम्यान जमीन हडप प्रकरणी बार्देश तालुक्यातील मामलेदार राहुल देसाई यांना या पदावरून बाजूला ठेवले होते. त्यांची आता मुरगाव मामलेदार पदी बदली करण्यात आली आहे.

 land scam
Goa Politics: पक्षांतरावर सुदिन ढवळीकर म्हणतात ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’

दरम्यान मुरगाव तालुक्यात मामलेदारांची कमतरता होती. मग गोवा फर्स्टचे परशुराम सोनुर्लेकर यांनी 24 ऑगस्ट 2022 रोजी मुख्य मामलेदार आणि संयुक्त मामलेदारांच्या नियुक्तीबद्दल महसूल विभागाला, तसेच दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिले होते.

आज मुरगाव तालुक्यात मामलेदारांची नियुक्ती केली खरी, पण त्याबद्दल सोनुर्लेकर यांनी नाराजी व्यक्त करताना, जमीन हडप प्रकरणात गुंतलेल्या व मुरगाव मामलेदार म्हणून नियुक्त केलेल्या राहुल देसाई यांच्या नियुक्ती बद्दल आक्षेप व्यक्त केला.

जमीन घोटाळ्यात गुंतलेल्या राहुल देसाई यांची नियुक्ती तत्काळ रद्द करावी. तसेच जोपर्यंत जमीन घोटाळ्यातून आरोप मुक्त होत नाही, तोपर्यंत त्यांना गोव्यात कोठेही त्याची वर्णी लावू नये अशी मागणी महसूल खाते व दक्षिण गोवा जिल्हा अधिकाऱ्याकडे केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Calangute Police Mobile Theft Arrest
Margao Woman Cheated 33 lakhs
GMC cardiology department staff protest
ED Raids Goa Delhi Karnal
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com