Cashew Festival Goa 2023 : पहिलाच काजू महोत्सव ठरला ‘लक्षवेधी’; गोव्याची स्वयंपूर्णतेकडे वाटचाल

काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी लाभले हक्काचे व्यासपीठ
Cashew Festival Goa 2023
Cashew Festival Goa 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

सपना सामंत

शनिवार व रविवार असे दोन दिवस पणजी येथे चाललेला पहिलाच काजू महोत्सव लक्षवेधी ठरला. पर्यटकांचा प्रतिसाद, स्टाॅल्स व इतर खाद्यपदार्थांची मेजवांनी आणि मनोरंजन यामुळे पहिलाच काजू महोत्सव खऱ्या अर्थाने अद्‍भूत अन् अभूतपूर्व असा झाला. काजू महोत्सवाद्वारे काजूला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी आणि

काजू उत्पादनात गोवा स्वयंपूर्ण व्हावा, यासाठी हा प्रयत्न होता. दोन दिवस चाललेल्या या महोत्सवाला लाभलेला प्रतिसाद, याचा कोणी विचारही केला नसेल. गोव्यात वेगवेगळी प्रदर्शने त्याचबरोबर नानाविध महोत्सवही वेगवेगळ्या क्षेत्रातून साजरे होतात.

मात्र काजू महोत्सव गोव्यात साजरा व्हावा, असा प्रयत्न वन विकास महामंडळाच्या अध्यक्षा तथा आमदार डाॅ. दिव्या राणे यांच्या संकल्पनेतून साकार झाला. उपस्थितांच्या लाभलेल्या उदंड प्रतिसादामुळे महोत्सव सफल झाला आहे.

काजू लागवड ही राज्याची निराळी खासियत आहे. काजू हे दुहेरी फळ आहे. काजूगर आणि बोंडूंचाही व्यावसायिक वापर होतो. काजू लागवड आणि त्यापासून मिळणारे उत्पन्न याचे तंत्र गोमंतकीयांना अवगत झाले आहे. काजू बोंडूंपासून फेणी व अन्य उत्पादन घेतले जाते.

फेणीमुळे गोव्याला प्रतिष्ठा लाभली आहे. फेणी हे राष्ट्रीय पेय व्हावे, हे वन विकास महामंडळाचे ध्येय होते अन् आहे. काजू उत्पादक शेतकरी या उत्पादनाशी निगडित अन्य घटक, उद्योजक, स्वयंसाहाय्य गट यांना एकाच छताखाली आणून त्याना चांगले व्यासपीठ देण्याच्या उद्देशाने हा महोत्सवाच्या माध्यमातून प्रयत्न होता व तो उद्देश सफल झाला, असेच म्हणावे लागेल.

महोत्सवात वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेल्या कष्टकरींचे ५० हून अधिक स्टॉल्स होते. अधिकाअधिक काजू उत्पादक व अन्य घटकांना यात सामावून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.

काजू गॅलरी अन् प्रात्यक्षिकेही

1. महोत्सवात 50 हून अधिक काजूशी निगडित स्टाॅल्स थाटण्यात आले होते. काजू, निरो, फेणी स्टाॅल लक्षवेधी ठरले. तसेच गोव्यातील महिला मंडळ, स्वयं सहाय्यक, हॅंडलूम, वेगवेगळे मसाले, कुंभार त्याचबरोबर अन्य स्टाॅल्सच्या माध्यमातून काजूचे महत्व आणि उपयोगाबद्दल माहिती, प्रात्यक्षिके, ग्रामीण भागातील महिला व काजू लागवड करणारे शेतकरी, त्यांचेच सर्वांधिक स्टाॅल्स येथे पाहायला मिळाले. महत्वाचे म्हणजे त्यांच्याकडे असलेला अनुभवही त्यांना यावेळी लोकांना सांगितला.

2. दरम्यान, काजू महोत्सवात चॉकलेट, बिस्किटे, काजू ज्यूस, काजू व्हीनेगर, स्कॉश हेही पाहायला मिळाले. तसेच काजु आमच्या अन्ना त्याचा कसा त्याचा वापर करता येतो, हेही पाहायला मिळाले.

काही स्टाॅल्सवर काजू मेक आणि चीज, रागी आणि काजूचे मिश्रण असलेले खेडक्याचे कालवण, काजु फ्रुट सालाद, निरो वापरून केलेले चिकन, काजू निरो आइस्क्रीम, काजू कोलांडा, काजू हुर्राक व अननसपासून बनवलेले पेय यांचा समावेश होता.

Cashew Festival Goa 2023
Mopa Taxi Counter : निर्णय लादण्याचा प्रयत्न केल्यास रस्त्यावर येऊन आंदोलन करणार; असोसिएशनचा सरकारला इशारा

महोत्सवाचे श्रेय कष्टकरी महिलांना !

हा महोत्सव वन विकास महामंडळाच्या सहकार्याने भरविण्यात आला आणि त्याला मिळालेला प्रतिसाद यामुळे आपण भारावून गेलो आहे,असे आमदार डॉ.दिव्या राणे यांनी सांगितले. आपण स्वप्नातही या महोत्सवाला एवढा चांगला प्रतिसाद लाभेल, याचा विचारही केला नव्हता. हे फक्त आणि फक्त सर्वांच्या सहकार्यामुळेच शक्य झाले आहे. या महोत्सवाच्या यशाचे श्रेय कष्टकरी महिलांना जाते,असेही त्या म्हणाल्या.

या महोत्सवातून शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने व्यासपीठ व काजूचा दर्जा प्राप्त होणे होता.या महोत्सवात काजूला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त होऊन शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचे पैसे त्यांना मिळवून देणे हा आहे,असेही त्या म्हणाल्या.

कष्टकऱ्यांच्या हाती चार पैसे यावेत !

गोव्यात काजू गर, निरा, फेणी, हुर्राक आदींवर प्रक्रिया केली जाते. आमच्या गोव्याच्या काजूला खूप महत्व आहे. मात्र काही लोक बाहेरच्या राज्यातून काजू विकत घेऊन राज्याचे नाव देत आहेत, हे कुठे तरी थांबणे गरजेचे आहे. काजूच्या बोंडापासून अनेक प्रक्रिया केला जाते.

आमच्या गोमंतकीय महिला खऱ्या अर्थाने मेहनत करून चार पैसे पदरी यावेत, यासाठी कष्ट करत असतात. या महोत्सवाच्या माध्यमातून एकाच छता खाली त्यांचे स्टाॅल्स लागले होते. त्यांना मिळालेला प्रतिसाद व अनुभव खूपच महत्त्वाचा आहे. महोत्सवापूर्वी आपल्याला खूप भीती होती. मात्र मिळालेला अनुभव व प्रतिसाद पाहून आपण भारावून गेले आहे. हा महोत्सव खरोखरच सकारात्मक विचार करण्यास प्रवृत्त करणारा ठरला आहे,असे आमदार दिव्या राणे म्हणाल्या.

दरवर्षी महोत्सव होणार हे आनंददायी !

मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनी आता दरवर्षी काजू महोत्सव साजरा होणार हे जाहीर केल्यानंतर असे वाटत आहे की, जे एवढ्या वर्षी जे शक्य झाले नाही. ते प्रत्यक्षात होत असल्याने आमच्या काजूला लवकरच आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त होऊ शकेल.

आज महिला सक्षम असून विविध क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करताना दिसत आहेत. या काजूच्या माध्यमातून गोवा सक्षम व स्वयंपूर्ण होणार आहे. या महोत्सवाला सरकारचे पूर्ण पाठबळ असून काजू उत्पादन वाढावे, हे सरकारचे धोरण आहे आणि दोन दिवस महोत्सवाला मिळालेला प्रतिसाद व खरेदी यामुळे स्टाॅल्सना चांगला लाभ झाला आहे. अशा महोत्सवातून महिला मंडळ, स्वयंसहाय्य गट यांना चांगला फायदा झाला आहे व गोव्याचा खरा काजू काय आहे हे सर्वांना माहीत झाले.

आपण ह्या महोत्सवासाठी खूप मेहनत घेतली, आणि त्यासाठी सर्वांनी सहकार्य केले. विशेषतः कष्टकरी महिलांचे योगदानही मोठे त्यामुळेच हा महोत्सव यशस्वी झाला आहे.

कृषी खात्यासह विविध महामंडळांचेही स्टॉल

हा महोत्सव यशस्वी होण्यासाठी कृषी खात्यासोबत वन खाते, उद्योग, व्यापार, वाणिज्य खाते, हस्तकला महामंडळ यांचेही स्टाॅल्स येथे उभारण्यात आले होते. हे सर्व स्टाॅल्स खासकरुन लोकांना माहिती देण्यासाठी ठेवण्यात आले होते. या स्टाॅल्स च्या माध्यमातून काजूची विविध प्रजाती, सरकारी योजना, उद्योग क्षेत्रातील काजूचे शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली. कृषी खात्यातर्फे काजू तयार होण्याची संपूर्ण प्रक्रियादेखील दाखविण्यात आली.

अनेकांना सेल्फीचा मोह अनावर

प्रवेशव्दारावर अनेकांना सेल्फी घेण्याचा मोह आवरता आला नाही,इतकी छान सजावट करण्यात आली होती. झिंगाट वाटणाऱ्या या महोत्सवात दाखल झालेल्यांमुळे कांपाल मैदान खचाखच भरलेले होते.महोत्सवात गोव्यातील खास पध्दार्थांना व्यासपीठ देऊन खऱ्या अर्थाने सत्तरी बरोबर राज्यातील ग्रामीण भागातील उत्पादक शेतकऱ्यांना एक नवी दिशा दिली आहे. महोत्सवातून बाहेर पडताना सर्वांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य विलसत होते.

महोत्सवात आस्वादक दर्दींची गर्दी : दोन दिवस चाललेल्या या महोत्सवात पर्यटक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. शनिवार व रविवार असल्याने महोत्सव काजू महोत्सव म्हणजे काय आहे, हा प्रत्यक्ष उपस्थिती लावून सर्वांनी अनुभव घेतला.

पहिल्या दिवशी सुमारे 7 हजार, तर दुसऱ्या दिवशी 15 हजारांहून अधिक लोकांची उपस्थिती लाभली. एकाच छताखाली काजू महोत्सव, खाद्य पदार्थ, आणि मनोरंजन याचा आस्वाद येथे येणाऱ्यांनी घेतला अगदी डीजेच्या तालावर अनेकांनी ठुमके लावण्याचाही आनंद लुटला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com