Margao Goa Fire Case
Margao Goa Fire CaseDainik Gomantak

Margao Fire News: मडगांव आके येथे फार्मसीला आग; सुदैवाने अनर्थ टळला

Madgaon Goa Fire Case: काही दिवसांपूर्वी लोयोला हायस्कूलच्या मागील बाजूस असलेल्या स्टेशनरी शॉपला आग लागली होेती.
Published on

Fire Caught in Madgaon

मडगांव आके येथील सिने विशांतच्या बाजूला असलेल्या इमारतीमधील पारस फार्मसीला आज मंगळवारी पहाटे आग लागली. मात्र, ही आग लगेच आटोक्‍यात आणण्‍यात अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना यश आल्याने मोठा अनर्थ टळला.

या आगीत सुमारे 50 हजारांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आलाय. इमारतीत इतर अनेक दुकाने आहेत. शिवाय कित्येक सदनिका असून कित्येक कुटुंबे राहतात.

पहाटे पारस फार्मसीतून धूर येत असल्‍याचे कोणीतरी पाहिले व लगेच त्यांनी फार्मसीचे मालक संदेश पै यांना फोन करून माहिती दिली. त्‍याचवेळी अग्निशमन दलाला कळविण्यात आले. जवानांनी आग आटोक्‍यात आणली.

Margao Goa Fire Case
South Goa Election 2024: दक्षिण गोव्यात भाजपचाच विजय, सासष्टीवरील कॉंग्रेसचे वर्चस्व संपले- आलेक्स सिक्वेरा

काही दिवसांपूर्वी लोयोला हायस्कूलच्या मागे सज्जन नाईक यांच्या मालकीचे सेलिब्रेशन गिफ्ट कम स्टेशनरी शॉप नावाचे दुकान आहे. या दुकानात असलेले मौल्यवान गिफ्ट वस्तू, स्टेशनरी, कॉम्पुटर, झेरॉक्स मशीन, प्रिंटर सहित इतर वस्तू या आगीच्या भक्षस्थानी पडल्या होत्या.

ही आग कशामुळे लागली यामागचे कारण समजू शकले नाही मात्र आगीचे प्रमाण एवढे होते की आग विझविण्यात अग्निशमनला दोन गाड्या वापराव्या लागल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com