Goa Fire Dept Fuel Scam: अग्निशमन दल इंधन घोटाळा चौकशी अहवाल दोन दिवसांत

Goa Fire Dept Fuel Scam: अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून इंधन घोटाळाप्रकरणी खात्यांतर्गत चौकशी सुरू.
Goa Fire Dept
Goa Fire DeptDainik Gomantak

Goa Fire Dept Fuel Scam

अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून इंधन घोटाळाप्रकरणी खात्यांतर्गत चौकशी सुरू करण्यात आली आहे. याप्रकरणी राज्यातील विविध स्थानकामधील वाहनांमध्ये भरलेल्या इंधानाबाबत लॉगबुक मागवण्यात आले असून त्याची पडताळणी सुरू आहे.

विविध विभागीय अधिकाऱ्यांकडून यासंदर्भात स्पष्टीकरण मागवले आहे. या चौकशीचा अहवाल येत्या दोन दिवसांत आपल्याकडे सुपूर्द केल्यानंतर त्यातील माहितीनुसार योग्य कारवाईचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती दलाचे संचालक नितीन रायकर यांनी दिली.

सरकारी इंधन कोटा दलाचे अधिकारी सरकारी वाहनांसाठी वापरण्याऐवजी तो खासगी वाहनांसाठी वापरण्यात येत असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्तामुळे दलाच्या जवानांत खळबळ माजली होती. हे प्रकार कोणत्या अग्निशमन दलाच्या स्थानकात घडत आहेत, याची चर्चा सुरू झाली होती.

इंधनाचा घोटाळा होत असल्याच्या वृत्ताने संचालकही गडबडून गेले होते. त्यांनी त्वरित या प्रकरणी चौकशीचे निर्देश खात्यातीलच एका वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत.

या प्रकरणाची दखल सरकारी पातळीवर घेण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची माहिती मागितली आहे. त्यामुळे हे खाते अडचणीत आले आहे.

Goa Fire Dept
Goa Accidents: वेगाची नशा! कुर्टी, वास्को, सांगे, कुळेत अपघाताच्या घटना; थोडक्यात वाचले जीव

अग्निशमन दलाच्या वाहनांमध्ये इंधन घालण्यासाठी खात्यातर्फे स्लिप्स (इंधन कुपन) असतात. या स्लिप्स पेट्रोल पंपवर दिल्यावर ठराविक इंधन सरकारी वाहनांत भरले जाते.

मात्र काही अधिकारी सरकारी वाहनांत घालायचे इंधन ही स्लिप्स सादर करून खासगी वाहनांत घालतात व बिल मात्र सरकारी वाहनाच्या क्रमांकावर घेतले जाते.

लेखा कार्यालयातून बिले मंजूर केली जातात. यात कोणाकोणाचे हात आहेत, हे या अहवालानंतर समोर येणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com