FDA Raid: पर्वरीतील 3 सरकारी कँटीनवर 'एफडीए'ची कारवाई! अस्वच्छता आणि बांधकामातील गंभीर त्रुटी आढळल्याने तिन्ही कँटीन तातडीने बंद

Goa FDA Canteen Inspection: अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) पर्वरी परिसरातील विविध सरकारी कार्यालये आणि आसपासच्या उपहारगृहांवर (कॅन्टीन) अचानक देखरेख मोहीम राबवून कडक कारवाई केली आहे.
Goa FDA Canteen Inspection
FDA RaidDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) पर्वरी परिसरातील विविध सरकारी कार्यालये आणि आसपासच्या उपहारगृहांवर (कॅन्टीन) अचानक देखरेख मोहीम राबवून कडक कारवाई केली आहे. या मोहिमेदरम्यान एकूण चार उपहारगृहांची तपासणी करण्यात आली; यामध्ये सरकारी कार्यालयांमधील तीन कॅन्टीन आणि मंत्रालयाजवळ असलेल्या एका खासगी रेस्टॉरंटचा समावेश होता.

अन्न आणि औषध प्रशासनाच्या संचालिका श्वेता देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासणी केलेल्या चारपैकी तीन उपहारगृहांमध्ये स्वच्छतेचा अभाव आणि बांधकामाशी संबंधित अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या. त्यामुळे या तिन्ही कॅन्टीनचे कामकाज तत्काळ थांबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कारवाई करण्यात आलेल्या सरकारी कॅन्टीनमध्ये शिक्षण विभाग, जलसंसाधन विभाग आणि लेखा विभागाच्या कॅन्टीनचा समावेश आहे. तर चौथे तपासण्यात आलेले खासगी रेस्टॉरंट मंत्रालयाबाहेर कार्यरत आहे.

Goa FDA Canteen Inspection
Goa Education: क्रमवारी वाढली, आता गुणवत्ता उंचावू दे! शिक्षणात गोव्याची पायाभूत कामगिरी भक्कम

विशेष मोहीम राबवणार

दरम्यान, राज्यातील सरकारी तसेच खासगी संस्थांमध्ये चालवल्या जाणाऱ्या सर्व कॅन्टीनमध्ये नियमावलीचे पालन होत आहे की नाही, याची तपासणी करण्यासाठी एफडीए लवकरच विशेष मोहीम राबवणार आहे. त्याअनुषंगाने, सर्व कॅन्टीन कंत्राटदारांनी अन्न सुरक्षेच्या निर्धारित मानकांचे काटेकोरपणे पालन करावे, असा स्पष्ट इशारा एफडीएने दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com