FDA Raid: गोव्यात विनापरवाना कॅटरर्स, पार्टी हॉलवर एफडीएचा बडगा; तीन आठवड्यांत परवाना घ्या, अन्यथा 10 लाखांपर्यंत दंड!

Goa FDA Action Against Unlicensed Caterers: राज्यातील विनापरवाना कॅटरर्स आणि नोंदणी नसलेल्या पार्टी हॉल चालकांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कारवाईचा इशारा दिला आहे.
Goa FDA Action Against Unlicensed Caterers
FDA RaidDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: राज्यातील विनापरवाना कॅटरर्स आणि नोंदणी नसलेल्या पार्टी हॉल चालकांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कारवाईचा इशारा दिला आहे. एफडीएच्या संचालक श्वेता देसाई यांनी यासंदर्भात परिपत्रक जारी केले असून, परवान्याशिवाय व्यवसाय करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून दहा लाख रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो.

सर्व विनापरवाना कॅटरर्स आणि पार्टी हॉल चालकांनी पुढील तीन आठवड्यांत ‘एफएसएसएआय’ परवाना मिळविण्यासाठी अर्ज करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संबंधित व्यावसायिकांनी ‘फॉसकॉस’ संकेतस्थळावर अर्ज करावा किंवा एफडीए कार्यालयाची मदत घेऊन नोंदणी पूर्ण करावी, असे परिपत्रकात नमूद केले आहे. कॅटरर्सनी एफएसएसएआय परवाना घेण्यासोबतच स्वच्छता नियमांचे काटेकोर पालन करणे आणि अन्न हाताळणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला वैध स्वच्छता कार्ड देणे बंधनकारक आहे.

Goa FDA Action Against Unlicensed Caterers
Goa Caste Census: गोव्यात जातनिहाय जनगणनेची तयारी सुरू; 16 नोव्हेंबरपासून नोंदणी, 3,557 प्रगणक मैदानात

नियमांचे पालन करा!

घरातून, वाहनांतून किंवा सोशल मीडियाद्वारे विनापरवाना अन्न व्यवसाय करणाऱ्यांवरही कारवाई केली जाणार आहे. अशा विक्रेत्यांनी आवश्यक परवाने घेऊन नोंदणी करावी आणि स्वच्छतेच्या नियमांचे पालन करावे, असे एफडीएने स्पष्ट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com