Goa News: मडगावात व्यापाऱ्यांनी अडविले फुटपाथ

Goa News: नगरपालिका प्रशासन या बेशिस्त व्यावसायिकांवर का कारवाई करत नाही, असा प्रश्न लोक विचारत आहेत.
Goa News |
Goa News | Dainik Gomantak

Goa News: मडगाव नगरपालिका क्षेत्रातील बऱ्याच फूटपाथवर अतिक्रमणे वाढली असून अनेक ठिकाणी रस्त्यालगतचे व्यापारी आपला माल फूटपाथवर ठेवून व्यवसाय करीत आहेत. नगरपालिका प्रशासन या बेशिस्त व्यावसायिकांवर का कारवाई करत नाही, असा प्रश्न लोक विचारत आहेत.

मडगाव पालिका क्षेत्रातील अनेक दुकानदार आपला माल खुलेआम पदपथावर ठेवून व्यवसाय करताना दिसतात. पदपथावर माल ठेवल्याने लोकांना रस्त्यावरून चालावे लागते. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आके, न्यू इरा हायस्कूल, पॉवर हाऊस, बोर्डा, मडगाव येथील रोपा आळसह इतर ठिकाणी व्यावसायिकांकडून फूटपाथवर माल ठेवला जात आहे. अशा प्रसंगी नगरपालिका काही दिवस अशा व्यावसायिकांवर कारवाई करते.

Goa News |
गोव्यात केवळ 14 वर्षांपुरता खनिज साठा | Goa has only 14 years of mineral reserve | Gomantak TV

बऱ्याचदा मालही जप्त करण्यात येतो. पण नंतर हे दुकानदार पुन्हा आपला माल फूटपाथवर ठेवतात. याविषयी मडगाव नगरपालिकेचे मार्केट निरीक्षक संतू फर्नांडिस यांनी सांगितले की, अशा बेशिस्त दुकानदारांवर पालिकेकडून कारवाई करण्यात येईल.

दरम्यान, फूटपाथवर बसून व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांमुळे दुकानदारांना ग्राहक मिळत नसल्याने या विक्रेत्यांवर कारवाई करण्याविषयी न्यू मार्केट परिसरातील व्यापारी मडगाव नगरपालिकेला भेट देणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com