Goa Crime News: सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजवरून मृत्यूची उकल

Goa Crime News: 30 हजारांसाठी दगडाने ठेचून खून : 24 तासांत संशयित जेरबंद
Goa Crime News| Goa News
Goa Crime News| Goa News Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Crime News: अख्तर रझा कसनुर (22) याच्या खूनप्रकरणी मायणा-कुडतरी पोलिसांनी दिकरपाली येथील संदीप गुप्ता (22) याला अटक केली आहे. अख्तरकडे असलेले पैसे लुटण्यासाठीच संशयिताने त्याचा खून केल्याचे स्पष्ट झाले आहे.

परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजवरून या प्रकरणाचा उलगडा करणे पोलिसांना सोपे झाले. खून झाला, त्यावेळी अख्तरच्या खिशात सुमारे 30 हजार रुपयांची रक्कम होती, अशी माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली.

संशयित संदीप गुप्ता हा मूळ बिहारचा असून गेली 16 वर्षे दिकरपाली येथे त्याचे वास्तव्य आहे. दिकरपाली येथे त्याचे भुसारी दुकान असून तो अख्तरला ओळखत होता.गुरुवारी दुपारी एक मृतदेह कालव्याच्या बाजूला सापडला होता.

घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पोलिसांना घातपाताचा संशय आला. त्यामुळे पोलिसांनी अज्ञाताविरोधात भादंसंच्या 302 कलमाखाली खुनाचा गुन्हा नोंदवला होता.

दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक अभिषेक धानिया यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक शिवेंदू भूषण यांच्या नेतृत्वाखाली मायणा-कुडतरीचे निरीक्षक मोहन गावडे, मडगावचे निरीक्षक तुळशीदास नाईक, कोलवाचे निरीक्षक फिलोमेना कॉस्ता, कुंकळ्ळीचे निरीक्षक तुकाराम चव्हाण, फातोर्डाचे निरीक्षक गिरेंद्र नाईक, कुडचडेचे निरीक्षक वैभव नाईक आणि सहकाऱ्यांनी या प्रकरणाचा छडा लावला.

आधी दंडुक्याने मारहाण, नंतर घेतला जीव

अख्तर हा मासे विकायचा. रविवारी दुपारी नेहमीप्रमाणे तो मासे विकून घरी आला होता. त्यावेळी पैसे त्याच्या खिशातच होते. हेच पैसे लुटण्याचा इराद्याने संशयिताने त्याला आपल्या मोटारसायकलवर बसवून नेसाय येथील कालव्याच्या ठिकाणी नेले.

Goa Crime News| Goa News
Crime Branch on Ration Scam मला अडकवण्यासाठी क्राईम ब्रँचवर राजकीय दबाव; मुख्य संशयिताचा युक्तीवाद

सुरुवातीला त्याला लाकडाच्या दंडुक्याने मारहाण केली आणि नंतर त्याच्या डोक्यावर दगड घालून खून केला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

...अन् पोलिसांचे काम फत्ते

कालवा परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची पोलिसांनी पाहणी केली होती. त्यानंतर हा घातपाताचा प्रकार असल्याचे दिसून आले. या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी तातडीने चक्रे फिरविली आणि 24 तासांच्या आत संशयिताच्या मुसक्या आवळल्या. संशयित संदीपने दिलेल्या माहितीनुसार खुनासाठी वापरलेला दगड आणि इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com