Goa Farming : गूळ निर्मितीमुळे ऊस उत्पादन वाढेल; शेतकरीही उत्सुक

प्रायोगिक तत्त्वावर चालना दिल्यास ऊस शेती बहरणार
Goa Farming
Goa FarmingDainik Gomantak
Published on
Updated on

वाळपई : गोव्यात गेल्या काही वर्षांपासून ऊस शेतकऱ्यांचा प्रश्न ज्वलंत बनला आहे. येथील एकमेव साखर कारखाना पूर्ण क्षमतेने चालत नसल्याने राज्यातील ऊस लागवडीचे क्षेत्र कमी होण्याची भीती आहे. काहींनी ऊस शेतजमीन अन्य पिकांसाठी रूपांतरित केली आहे. सरकारने जर साखरेऐवजी ऊस पीक टिकविण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर गूळ निर्मितीला प्राधान्य दिल्यास ऊस उत्पादन वाढीसाठी तो एक सक्षम पर्याय ठरू शकतो. यामुळे ऊस उत्पादक शेतकरीही सावरतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

ऊस शेतजमिनीत भाजीसारखी कमी कालावधीत येणारी पिके घेणे ठीक आहेत. पण वर्षानुवर्षे उत्पादन देणारी बागायती उदा. सुपारी, नारळ, काजू अशी पिके घेतल्यास ऊस शेती त्या जागेत करणे शक्य होणार नाही. म्हणूनच ऊस शेतीला प्राधान्य द्यावे.

Goa Farming
Goa Congress : काँग्रेसचे आमदार भाजपच्या संपर्कात

गुळाला मोठी बाजारपेठ!

वाळपई कृषी विभागीय अधिकारी विश्वनाथ गावस म्हणाले, बाजारपेठेत मिळणारा पांढरा म्हणजेच सल्फरयुक्त गूळ असतो. त्यात रसायने असतात. आता बाजारात परराज्यातील बंद पाकिटातील सेंद्रिय गूळ विक्रीस येतो. राज्यात जर गूळ बनविण्याच्या विचाराला चालना मिळाली तर त्याला स्थानिक बाजारपेठ सहज उपलब्ध होते. त्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर कार्यवाही केल्यास ऊसाला नवसंजीवनी मिळेल.

उत्पादन घेतले जाते. ते थांबले पाहिजे. कारण ऊसाला चांगला उतारा मिळण्याची गरज आहे. साखरेसाठी जमिनीतील घटक, आम्ल, वातावरण, ऊसाची जात अशी उतारा कमी मिळण्याची कारणे असतात.

- विश्‍वनाथ गावस, कृषी अधिकारी.

सरकारने प्रोत्साहन द्यावे

खोडये येथील शेतकरी कृष्णप्रसाद गाडगीळ म्हणाले, काणकोण, पेडणे भागात लोक आपल्यापुरता सेंद्रिय गूळ तयार करतात. सरकारी यंत्रणेने सर्वे करून सध्या राज्यात किती ऊस उत्पादन होते, त्यानुसार गुळासाठी ऊस जातीची निवड करण्याला प्राधान्य दिले पाहिजे. साखरेऐवजी गुळाला प्राधान्य दिले पाहिजे. काजू, नारळ, सुपारी पिके लहरी वातावरणामुळे बेभरंवशाची बनली आहेत. पावसामुळे काजूची प्रत बिघडते, किमतीत चढ-उतार होतात. पण उसाचे तसे नाही. कमी कष्टात बक्कळ पैसे मिळू शकतात. त्यासाठी सरकारने गूळ निर्मितीला साथ दिली तर ऊस उत्पादकांना वरदान ठरेल, असे गाडगीळ म्हणाले.

सेंद्रिय गूळनिर्मितीने महसूल प्राप्तीला वाव

सेंद्रिय गूळ निर्मितीला प्राधान्य देणे आवश्यक आहे. कारण सध्या मधुमेही रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. मधुमेही रुग्णांना साखर खाऊ नये, असा सल्ला दिला जातो. त्यामुळे राज्यात जर सरकारने सेंद्रिय गूळ निर्मितीला प्राधान्य देताना पायलट प्रकल्प राबविला तर भविष्यात ऊस उत्पादकांसाठी तो दुग्धशर्करा योग ठरेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com