Goa Farmers Loan Scheme: शेतकरी, मच्छिमारांसाठी महत्वाची बातमी! 4% व्‍याजाने पाच लाखांपर्यंतचे कर्ज; अधिसूचना जारी

Goa Agriculture Loan: राज्‍यातील कृषी तसेच मत्‍स्‍योद्योग व्‍यवसायात असलेल्‍या शेतकऱ्यांना आता चार टक्‍के व्‍याजदराने पाच वर्षांसाठी पाच लाखांपर्यंतचे कर्ज देणारी योजना कृषी खात्‍याने सुरू केली आहे.
Loan
LoanDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्‍यातील कृषी तसेच मत्‍स्‍योद्योग व्‍यवसायात असलेल्‍या शेतकऱ्यांना आता चार टक्‍के व्‍याजदराने पाच वर्षांसाठी पाच लाखांपर्यंतचे कर्ज देणारी योजना कृषी खात्‍याने सुरू केली आहे. कृषी संचालक संदीप फळदेसाई यांनी याबाबतची अधिसूचना जारी केली आहे.

जमीन कसणाऱ्या तसेच मत्‍स्‍योद्योगात कार्यरत शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तीन लाखांचे आपत्‍कालीन कर्ज घेता येणार आहे. शिवाय त्‍यांना पाच लाखांचेही कर्ज घेण्‍याची मुभा असेल.

ही योजना १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२८ या तीन वर्षांच्‍या कालावधीसाठी असेल. त्‍यानंतर योजनेच्‍या पुढील अंमलबजावणीबाबत पुनरावलोकन केले जाईल. परंतु, शेतकऱ्यांना कर्ज फेडण्‍यासाठी पाच वर्षांचा कालावधी असेल.

योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना व्‍यावसायिक बँका, गोवा राज्‍य को-ऑपरेटिव्‍ह तसेच कृषी को-ऑपरेटिव्‍ह बँकांकडून कर्ज घेता येईल, असे फळदेसाई यांनी जारी केलेल्‍या अधिसूचनेत म्‍हटले आहे.

Loan
Goa Education Loan: गोव्यात 481 कोटींची शैक्षणिक कर्ज थकीत, 5108 खाती NPA मध्‍ये; केंद्र सरकारचा अहवाल

...अशी असेल कर्ज प्रक्रिया

कर्ज घेऊ इच्‍छिणाऱ्या शेतकऱ्यांना बँकांशी संपर्क साधावा लागेल. शेतकऱ्यांची गरज, वित्तीय मार्गदर्शक तत्त्वे आणि रिझर्व्ह बँकेच्या आदेशांनुसार बँक कर्ज मंजूर करेल. बँकांच्या शाखा त्यानंतर सहामाहीत वैयक्तिक शेतकऱ्यांचे दावे त्यांच्या मुख्य कार्यालयाकडे पाठवतील. वित्तीय संस्थेचे मुख्य कार्यालय सर्व दाव्यांचे जिल्हावार संकलन करेल आणि ते कृषी खात्‍याकडे पाठवेल. कृषी खात्‍याचे अधिकारी रक्कम, कालावधी आदी पडताळून पाहतील आणि ऑफलाईन पद्धतीने मंजुरी आणि वितरणासाठी संबंधित जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडे पाठवतील. वित्तीय संस्थेचे मुख्य कार्यालय पुढे त्यांच्या संबंधित शाखांमध्ये रक्कम जमा करेल, असेही अधिसूचनेत म्‍हटले आहे.

Loan
Goa NABARD Loan: ‘नाबार्ड’कडून गोव्याने घेतले 1368 कोटींचे कर्ज! लोकसभेत झाला खुलासा; सीतारामन यांनी केली आकडेवारी सादर

कर्ज योजनेची वैशिष्ट्ये

अल्पकालीन, दीर्घकालीन कृषी कर्जांवर व्याज अनुदान उपलब्ध.

कृषी आणि पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कृषी कार्ड अनिवार्य.

कृषी आणि पशुपालन शेतकऱ्यांच्या किसान क्रेडिट कार्डधारकांनाही (केसीसी) व्याज अनुदान.

पशुपालन, मत्स्यपालन उपक्रमांना कर्जासाठीची मार्गदर्शक तत्त्वे संबंधित विभाग आणि वित्तीय संस्था करणार जारी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com