Vegetables: गोव्यात एका दिवसात दोन लाखाची भाजी खरेदी! 'फलोत्पादन'ची सहा कोटींची उलाढाल

Goa News: राज्याला स्वयंपूर्ण करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून राज्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भाजी उत्पादन करावे, यासाठी विविध योजना राबविल्या जात आहे.
Vegetables
Vegetables Goa Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्याला स्वयंपूर्ण करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून राज्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भाजी उत्पादन करावे, यासाठी विविध योजना राबविल्या जात आहे. मागील दोन-तीन वर्षांपासून राज्यात भाजी लागवडीत प्रगती होत आहे.

मोठ्या प्रमाणात युवा वर्ग शेतीकडे वळत असून मागील वर्षभरात गोमंतकीय शेतकऱ्यांनी पिकवलेली जवळपास ६ कोटी रूपयांची भाजी गोवा फलोत्पादन महामंडळाने खरेदी केल्याचे महामंडळाचे व्यवस्थापक चंद्रहास देसाई यांनी सांगितले.

देसाई म्हणाले, गोवा सरकार राज्यातील शेतकऱ्यांनी पिकविलेल्या १९ भाजी प्रकारावर हमी भाव देते, त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या उत्पादनावर निश्‍चित रक्कम मिळणार असल्याचे आश्‍वासन प्राप्त होते, त्यामुळे आज अनेक शेतकरी भाजी उत्पादन घेत आहेत. आम्हांला भाजी पुरविणारे सुमारे १५ शेतकरी असे आहेत की जे वर्षाला भाजी विक्रीतून पंधरा लाख रुपये कमवतात, त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भाजी लागवडीकडे वळावे, असे आवाहन त्यांनी केले.

Vegetables
Goa Vegetable Rates: वाढत्या महागाईमुळे ऐन हिवाळ्यात नागरिकांची होरपळ! टोमॅटो,लसणाच्या दरात पुन्हा वाढ, कडधान्येही भडकली

खरेदीचा एक विक्रम!

राज्यातील विविध भागातील फलोत्पादनाच्या दुकानात ताजी आणि बाजारापेक्षा कमी दरात भाजी मिळते, त्यामुळे मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात भाजी खरेदी केली जाते. शहरी भागासही ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे. आमच्या महामंडळाच्या कार्यालयातील गाळ्यांत काही दिवसांपूर्वी दिवसभरात २ लाख ३ हजाराची भाजी खरेदी झाली. जी एकाच दिवशी सर्वाधिक खरेदीचा एक विक्रम म्हणावा लागेल. आमची सरकारच्या उद्दिष्टाप्रमाणे स्वयंपूर्णतेकडे वाटचाल सुरू असल्याचे देसाई यांनी सांगितले.

Vegetables
Winter Vegetable: हिवाळ्यात गोव्यात मिळणाऱ्या भाज्या आणि त्यांचे महत्व वाचा

फलोत्पादनचे भाजी विक्री केंद्रे ११९६

फलोत्पादनची भाजी खरेदी केंद्र १७

मोबाईल व्हॅन १२

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com