Goa Assembly Monsoon Session वन विभागाने जंगलात इतर कामांना सक्त मनाई केली आहे. पीक पद्धतीत बदल करण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती, चोवीस तास रेस्क्यू पथके परिक्षेत्रातील वनक्षेत्रात कार्यरत करण्यात आल्याचे वनमंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले.
अलीकडच्या वर्षांत वन्यप्राणी वारंवार मानवी वस्तीच्या संपर्कात येतात आणि रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान करतात.
कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी वनमंत्री विश्वजीत राणे यांना गुरुवारी (ता.३) अतारांकित प्रश्न विचारला होता की, वन्यप्राण्यांकडून शेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत वन विभागाने काय पावले उचलली आहेत.
या प्रश्नाला उत्तर देताना राणे म्हणाले की, वन्यप्राण्यांमुळे पाळीव प्राण्यांचे किंवा इतर मालमत्तेचे कोणतेही नुकसान झाल्यास पीडितांनी नुकसान भरपाईसाठी वन विभागाकडे संपर्क साधावा आणि वन्यप्राण्यांमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पीडितांनी नुकसान भरपाईसाठी कृषी विभागाकडे जावे.
वन विभागाव्यतिरिक्त जंगलात इतर कामे करण्यास मनाई आहे. वन संरक्षण कायदा, १९८० आणि वन्यजीवांची तरतूद संरक्षण कायदा, १९७२ अंतर्गत पूर्वपरवानगीशिवाय वनक्षेत्रात कोणतेच काम करण्यास सक्त मनाई आहे.
माकडांना खाऊ घालू नये किंवा घराबाहेर अन्न ठेवू नये यासाठी स्थानिक समुदायांमध्ये जागरूकता, कृषी विभागाशी सल्लामसलत करून पीक पद्धतीत योग्य ते बदल करणे, अनुचित घटना टाळण्यासाठी समस्याग्रस्त आणि तणावग्रस्त वन्यप्राण्यांची सुटका करण्यासाठी चोवीस तास बचाव पथके कार्यरत करणे, टोल फ्री क्रमांक १९२६ कार्यान्वित करणे या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. - विश्वजीत राणे, वनमंत्री
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.