Goa Assembly Monsoon Session: अबकारी घोटाळा : कारकुनाचा जबाबच घेतला नाही

विजय सरदेसाई : पेडणे तालुक्‍यात पाच वर्षांत झालेल्‍या पार्ट्यांबाबत चौकशी करा.
Vijay Sardesai
Vijay SardesaiDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Excise Scam : पेडणे अबकारी खात्यात झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या कथित घोटाळाप्रकरणी व तालुक्यात झालेल्या पार्ट्यांविषयी माहिती देणारी श्‍‍वेतपत्रिका काढावी व या अधिवेशन काळापर्यंत ती यावी, अशी मागणी आमदार विजय सरदेसाई यांनी केली. मागण्या आणि कपात सूचनांवर ते बोलत होते.

पेडणे अबकारी खात्यातील सहाजणांचा घोटाळ्‍यात सहभाग आहे. दोघांना निलंबित केले तर चौघांना कारणे दाखवा नोटीस पाठविली. जो कारकून आहे, त्याला निलंबित केले. पण त्याचा जबाबच घेतला नाही.

मागील पाच वर्षांत उपजिल्हाधिकाऱ्यांनी पेडणे तालुक्यात किती पार्ट्यांना मंजुरी दिली, हे तपासावे. त्यातून किती महसूल खात्याला मिळाला, ते समजून येईल. हा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा आहे, असा आरोप सरदेसाई यांनी केला.

मुख्यमंत्र्यांनी मद्याचे दर कमी होतील असे काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते, परंतु तसे झाले नाही. मद्यव्यवसाय हा पर्यटन व्यवसायाला पूरक आहे, असे सरदेसाई यांनी सांगितले.

Vijay Sardesai
Goa Assembly : जनावरं आमच्या प्रेमात का पडलेत? कारण सरकार त्यांच्यावर प्रेम करते - रवी नाईक | BJP

महिला चालवतेय बेकायदा बॉक्साईट खाण

खाणी निश्‍चित सुरू कधी होतील याबाबत सरकारने स्‍पष्‍ट माहिती द्यावी. जिल्हा खाण निधी हा रस्ते किंवा लहानसहान कामांसाठी वापरू शकत नाही.

या निधीचा उपयोग सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण केंद्र अशा कामांसाठी करता येतो.

नाकेरी येथील एक महिला बॉक्साईट खाण चालविते. त्या खाणीची ५० वर्षांचा लीजकरार संपला आहे. तरीही सरकार ती खाण बंद करीत नाहीत आणि त्याविषयी तक्रार का केली जात नाही, असा आरोप सरदेसाई यांनी केला.

Vijay Sardesai
Goa Assembly : GMC ड्रग्सच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री बोरकरांवर भडकले | Viresh Borkar | CM Sawant

मद्यविक्रीत परप्रांतीय

व्हिस्कीवर २०० वरून आता ४०० रुपये कर लावला आहे. मद्यविक्रीमध्ये बिगरगोमंतकीय उतरले आहेत. त्यांच्याकडून मद्य घेणे धोक्याचे ठरू शकते.

विक्रेत्यांकडून हप्त घेतले जातात. २५ वर्षांचा व्यवसाय दाखला सक्तीचा असावा. छापे मारल्‍यावर नियमपुस्तिका अधिकारी दाखवतात आणि पैसे घेतात, असा आरोप सरदेसाईंनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com