Goa Congress : ‘अबकारी’च्या घोटाळ्यातील दोषींवर कठोर कारवाई करा; काँग्रेसचे आयुक्तांना निवेदन सादर

आणखी काही जणांचा सहभाग!
Goa Congress
Goa Congress Dainik Gomantak

Goa Excise Department Scam: दैनिक ‘गोमन्तक’ने अबकारी खात्यातील आर्थिक घोटाळा उघड केल्यानंतर या प्रकरणातील तीन संशयितांना निलंबित केले असले, तरी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करावी. शिवाय या प्रकरणात आणखी काहीजण अडकले आहेत, त्यांच्यावरही कायदेशीर बडगा उगारला पाहिजे, अशी परखड मागणी काँग्रेस पक्षाच्या शिष्‍टमंडळाने मंगळवारी अबकारी खात्याकडे केली.

अबकारी खात्याच्या आल्तिनो येथील कार्यालयात आयुक्त नारायण गाड हे अनुपस्थित असल्याने साहाय्यक आयुक्त श्रीकांत पेडणेकर यांची कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. त्यात विजय भिके, प्रदीप नाईक, जनार्दन भंडारी, महेश म्हांबरे, मंगलदास नाईक, वीरेन आणि मान्यवरांचा सहभाग होता.

यावेळी नाईक म्हणाले, या प्रकरणात संशयितांना निलंबित करून काहीच उपयोग होणार नाही. त्यांच्याविरोधात कायदेशीर तक्रार दाखल करावी. कोणाच्या दबावामुळे अबकारी खाते कारवाई करीत नाही का, असा सवाल त्यांनी केला.

दोन दिवसांपूर्वी आम्ही आयुक्तांना भेटण्यासाठी आलो, तेव्हा त्यांनी कारवाईचे आश्‍वासन दिले होते. परंतु निलंबन आणि पैसे वसूल करण्याबरोबरच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणे आवश्‍यक होते. यात आणखी काहीजण अडकले आहेत, त्यांच्यावरही कारवाई ‍व्हायला हवी.

Goa Congress
Xavier Dsouza wins Bronz: राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत गोव्याच्या झेवियर डिसोझाला ब्राँझपदक

कॉंग्रेसचे स्टिंग ऑपरेशन

विजय भिके म्हणाले, अबकारी खात्यात नव्हे, तर सर्वच खात्यांत भ्रष्टाचार सुरू असल्याचे सांगितले जाते, परंतु संबंधित व्यक्तीने एवढी रक्कम कोठून आणली, ती त्याला कोणी दिली, याचा तपास होणे आवश्‍यक आहे.

भंडारी म्हणाले, अबकारी खाते हे मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित येते. आम्ही या खात्याचे स्टिंग ऑपरेशन काही दिवसांत जनतेसमोर आणणार आहोत. चेक नाक्यापासून ते खात्यापर्यंत काय घडते, हे सर्व या स्टिंग ऑपरेशनमधून पुढे येईल.

Goa Congress
Pension Scheme : राज्य सरकारने खलाशांसाठी कायमस्वरूपी पेन्शन योजना लागू करावी

‘गोमन्तक’चा अग्रलेख वाचा!

काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पेडणेकर यांना दैनिक ‘गोमन्तक’मध्ये मंगळवारी (ता. ४ जुलै) संपादकीय पानावर ‘प्रश्‍न मुख्यमंत्र्यांच्या सचोटीचा’ या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेला अग्रलेख वाचण्यास सांगितले.

राज्यातील अग्रगण्य दैनिकाने भ्रष्टाचाराविषयी जे काही मत मांडले आहे, ते त्यांनी पडताळून पहावे, असेही सुचविले. शिवाय ते संपादकीय पान पेडणेकर यांना शिष्टमंडळाने निवेदनासोबत भेट दिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com