भारताच्या अध्यक्षतेखालील होणाऱ्या जी-20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर 3 ते 5 जून पहिल्या गोवा पर्यावरणीय चित्रपट महोत्सव पणजीत आयोजित केला आहे, अशी माहिती पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल यांनी दिली.या चित्रपट महोत्सवाचे पोस्टर आज पणजीत लॉँच करण्यात आले. यावेळी जी.२० नोडल अधिकारी संजीत रॉड्रिग्स उपस्थित होते.
मंत्री काब्राल म्हणाले आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आणि जी २० परिषदेचा एक भाग म्हणून 3 ते 5 जून या काळात हा महोत्सव होणार आहे. ओल्ड जीएमसी संकुलात गोवा मनोरंजन सोसायटी - मॅकेनेस पॅलेस येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचा हा महोत्सव पहिला असला तरी यापुढे हा महोत्सव कायम करण्याची घोषणा पर्यावरण मंत्री काब्राल यांनी केली आहे.
50 चित्रपटांची मेजवानी
महोत्सव काळात जगभरातील 50 हून अधिक चित्रपट पाहायला मिळणार असून ओमान, पोर्तुगाल, फिनलंड, आर्यलंड, रशिया क्रोएशिया, स्पेन या देशातून पर्यावरणीय चित्रपट महोत्सवात सहभागी होणार असल्याची माहिती संजीत रॉड्रिग्स यांनी दिली. या महोत्सवाची पूर्वनोंदणी सर्वांसाठी खुली आणि मोफत असून ती करणे अनिवार्य आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.