Goa Recruitment: राज्यात लवकरच LDC आणि MTS कर्मचाऱ्यांची भरती; 700 पदांसाठी निघणार जाहिरात

200 LDC पदे तर 500 MTS पदे
CM Pramod Sawant
CM Pramod Sawant Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Recruitment: राज्यातील विविध विभागांतील सुमारे 700 पदांवरील भरतीसाठी जाहिरात नोव्हेंबर महिन्यात काढली जाईल. यात 200 लोवर डिव्हिजन क्लर्क (LDC) पदे आणि सुमारे 500 बहु कार्यकारी कर्मचारी (MTS) लोव्हर डिव्हिजन क्लर्क यांचा समावेश आहे. मुख्यमंत्र्यांच्या हवाल्याने टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे.

मुख्यमंत्री सावंत यांनी म्हटले आहे की, आम्ही प्रथम 700 पदांसाठी जाहिराती जारी करू आणि दुसऱ्या टप्प्यात, उर्वरित गट क मधील पदांसाठी जाहिराती दिल्या जातील. 200 LDC पदे आणि सुमारे 500 MTS पदांसाठी जाहिरात काढली जाईल.

CM Pramod Sawant
Goa Employment: 'क' वर्गातील पदभरती जानेवारीपर्यंत पूर्ण करणार राज्य सरकार

गोवा स्टाफ सिलेक्शन कमिशनकडे (एसएससी) रिक्त पदांची यादी बावीस सरकारी विभागांनी पाठवली आहे. राज्य सरकार एसएससीच्या माध्यमातून पहिल्यांदाच नोकरभरती करत आहे. येथील ईडीसी पाटो प्लाझा येथील स्पेसेस इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून एसएससीचे कामकाज सुरू झाले आहे.

वृत्तपत्रांमध्ये आणि आयोगाच्या वेबसाइटवर जाहिराती प्रसिद्ध झाल्यानंतर लगेचच भरतीची प्रक्रिया सुरू होईल.

आयोगाच्या संकेतस्थळावरील माहिती कोंकणी आणि मराठी भाषेत उपलब्ध असून दिव्यांग व्यक्तींना ती उपलब्ध करून दिली जाईल. पोर्टलमध्ये प्रत्येक विभागाच्या पदांसाठी परीक्षा तसेच मॉक टेस्टचा अभ्यासक्रम असेल. पूर्वीच्या प्रश्नपत्रिकाही उपलब्ध करून दिल्या जातील.

CM Pramod Sawant
Goa Short Film Festival: दहावा गोवा लघुपट महोत्सव पणजीत; 4 आणि 5 ऑक्टोबरला होणार

विभागांमध्ये नियमित नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावा लागेल. प्रत्यक्ष अर्ज सादर करण्यासाठी उमेदवारांना यापुढे विविध विभाग कार्यालयांमध्ये जावे लागणार नाही.

उमेदवार लवकरच ऑनलाइन अर्ज करू शकतील आणि एक समर्पित हेल्प डेस्क स्थापन केला जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com