Goa Electricity Complaints: पणजीत 'सरकार तुमच्या दारी' अभियानाला नागरिकांचा थंड प्रतिसाद; वीज खात्याच्या तक्रारींवर सुदिन ढवळीकरांची घेतली बैठक

Goa Electricity Department: विद्युत भवनातील परिषदगृहात ‘सरकार तुमच्या दारी’चे आयोजन केले होते. मंत्री ढवळीकर यांच्या उपस्थितीत वीज खात्याचे अभियंते, विविध उपविभागीय प्रमुख उपस्थित होते.
Goa Electricity Department
Goa Electricity ComplaintsDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: राज्यभर भाजप-‘मगो’ युती सरकारने सुरू केलेल्या ‘सरकार तुमच्या दारी’ या अभियानांतर्गत पणजीत गुरुवारी वीज खात्याच्यावतीने ग्राहकांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी कार्यक्रम आयोजित केला होता; परंतु केवळ सात ते आठ तक्रारीच दाखल झाल्या असून, त्यावर सात दिवसांत निपटारा करण्याचा आदेश वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिला.

विद्युत भवनातील परिषदगृहात ‘सरकार तुमच्या दारी’चे आयोजन केले होते. मंत्री ढवळीकर यांच्या उपस्थितीत वीज खात्याचे अभियंते, विविध उपविभागीय प्रमुख उपस्थित होते. ढवळीकर म्हणाले, आपल्याकडे पणजी, ताळगाव आणि सांताक्रूझ येथील लोकांकरिता हे अभियान राबवण्याची जबाबदारी देण्यात आली होती. वीज खात्याविषयी आलेल्या तक्रारींची संख्या पाहिल्यानंतरच या खात्याचे काम कशा पद्धतीने चालते, याचा अंदाज येतो.

Goa Electricity Department
Goa Politics: 'पोलिसांनी आधी सत्य शोधावे'; हरमल पंचक्रोशीच्या तक्रारीवरून पार्सेकर-आरोलकर आमनेसामने

दरम्यान, ‘तम्नार’ प्रकल्पाची सद्यस्थितीत काय आहे, अशी विचारणा केली असता गोवा आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवर ‘तम्नार’ प्रकल्पासाठी आवश्यक असणारे काम गोवा सरकारकडून झालेले आहे, असे ढवळीकर यांनी नमूद केले. मात्र, त्यावर अधिक स्पष्टीकरण ते देऊ शकले नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com