पणजी: गोवा वीज विभागात (Goa electricity department recruitment) सरकारी नोकरी (Government job) शोधणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी आहे. गोव्यात लाइनमनच्या पदांसाठी भरती सुरू आहे. दहावीनंतर आयटीआय उत्तीर्ण तरुण लाइनमनच्या नोकरीसाठी अर्ज करू शकतात. या पदासाठी आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. गोवा विद्युत विभागाने 10वी पास असिस्टंट लाइनमन/वायरमन/हेल्पर या पदांसाठी अर्ज मागवले आहेत.
गोव्यात 10वी पाससाठी बंपर जागा
गोवा विद्युत विभागाने 10वी पास असिस्टंट लाइनमन/वायरमन/हेल्पर या पदांसाठी बंपर भरती जारी केली आहे. नोटीसनुसार, या पदासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 05 डिसेंबर 2021 आहे. नोटीसनुसार, उमेदवाराने 10वी नंतर इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये आयटीआय उत्तीर्ण केलेला असावा. या भरतीमध्ये असिस्टंट लाइनमन किंवा वायरमनच्या 34 जागा रिक्त आहेत. तर लाईन हेल्पर पदाच्या 300 जागा रिक्त आहेत. नोटीसमध्ये दिलेल्या माहितीनुसार उमेदवाराला इलेक्ट्रिकल लाईन बांधणीचा किमान दोन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर कोकणी भाषा बोलता यायला पाहिजे.
वयोमर्यादा
या पदासाठी वयोमर्यादा 45 वर्षे आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना, ST/SC च्या उमेदवारांना वयोमर्यादेत 5 वर्षांची सूट आहे. तर OBC च्या उमेदवारांना 3 वर्षांची सूट देण्यात आली आहे. आणि PwD श्रेणीतील उमेदवारांना 10 वर्षे सूट देण्यात येणार आहे. माजी सैनिकांना, नौदल, हवाई दल, CRPF, BSF, CISF, ITBP आणि SSB मध्ये दिलेल्या सेवेच्या मर्यादेनुसार वयोमर्यादेत सूट देण्यात येणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.