काँग्रेसला पूर्ण बहुमत द्या, गोवेकारांच्या सर्व अपेक्षा पूर्ण करू...

सत्तेवर आल्यास जाहिरनाम्याची पूर्तता करवून घेण्यासाठी मी स्वतः येईन : चिदंबरम
Congress Election Observer P. Chidambaram
Congress Election Observer P. ChidambaramDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Election 2022: गोव्यात (Goa) स्थिर सरकार देण्याची क्षमता फक्त काँग्रेस पक्षात (Congress Party) आहे. गोवेकारांच्या अपेक्षांना आम्ही 100 टक्के खरे उतरू मात्र त्यासाठी काँग्रेस पूर्ण बहुमताने सत्तेवर येण्याची गरज आहे. तुम्ही आम्हाला परत सत्तेवर आणा आम्ही तुमच्या अपेक्षा पूर्ण करू असे आश्वासन काँग्रेसचे केंद्रीय निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम (Congress Election Observer P. Chidambaram) यांनी दिले.

Congress Election Observer P. Chidambaram
गोव्याच्या विकासासाठी पूर्ण बहुमताचे सरकार द्या: अमित शहा

काँग्रेसचा जाहीरनामा कसा असावा हे जाणून घेण्यासाठी चिदंबरम यांनी आज मडगावात लोकांशी संवाद साधत त्यांच्या सूचना ऐकून घेतल्या. यावेळी पर्यावरण चळवळीतील कार्यकर्ते, सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती, काँग्रेसचे कार्यकर्ते आणि उद्योजकानी आपल्या सूचना मांडल्या.

ह्या सूचना ऐकून घेतल्यानंतर बोलताना चिदंबरम म्हणाले, तुमच्या सूचना चांगल्या आहेत. पण तुमच्या अपेक्षा पूर्ण करायच्या असतील तर काँग्रेस पूर्ण बहुमताने सत्तेवर येण्याची गरज आहे. सध्या बाहेरून जे गोव्यात पक्ष आले आहेत ते गोव्याचे राजकारण बिघडविण्यासाठीच आले आहेत. हे लक्षात ठेवून गोवेकारांनी मतदान करण्याची गरज आहे. आम्ही सत्तेवर आल्यास आम्ही जनतेसमोर मांडलेल्या जाहिरनाम्याची पूर्तता होते की नाही हे पाहण्यासाठी मी प्रत्येक वर्षी गोव्यात येऊन त्याचा आढावा घेऊ असे त्यांनी सांगितले.

Congress Election Observer P. Chidambaram
विजेच्या खांबावरील अमित शहांचे बॅनर काढा; युवक काँग्रेसची मागणी

आजच्या या ओपन फोरम चर्चेत लोकांनी विविध मुद्दे मांडले. त्यात प्रामुख्याने रोजगारभिमुख शिक्षण, चांगल्या आरोग्य सुविधा, पर्यावरणाचे रक्षण आणि गोव्याच्या स्वतंत्र अस्तित्व राखून ठेवणाऱ्या योजनांचा समावेश होता. तरुण पिढीला उद्यमशील बनविण्यासाठी रोजगारभिमूक शिक्षण सुरू करण्या बरोबरच, गोमांतकीयांना उद्योग सुरू करण्यासाठी पोषक वातावरण, बाहेरच्या लोकांना गोव्यात उद्योग सुरू करायचे असल्यास स्थानिकांना त्यात भागीदार बनविण्याची अट, स्वयंपाकाचा गॅस आणि पेट्रोलच्या वाढत्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी करामध्ये कपात, ग्रामीण भागात उच्च शिक्षण आणि चांगल्या आरोग्य सेवा, सक्षम सार्वजनिक दळणवळण सुविधा, तसेच पर्यावरणाचे रक्षण आदी सूचना करण्यात आल्या. यावेळी उद्योजक दत्ता नायक, पर्यावरण चळवळीतील ओलेन्सीयो सिमोईस, रॉयला फेर्नांडिस, झरीना डिकुन्हा, सामाजिक चळवळीत सक्रिय असलेले रामकृष्ण जल्मी, डिक्सन वाझ, सावियो डिसिल्वा आदींनी आपल्या सूचना मांडल्या.

यावेळी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, खासदार फ्रान्सिस सार्दीन, आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, महिला आघाडीच्या अध्यक्ष बिना नाईक, जाहीरनामा समितीचे अध्यक्ष रमाकांत खलप तसेच सह अध्यक्ष एल्विस गोम्स हे उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com