स्नेहा हसोटीकर
Diwali 2023: पोंबुर्फा नजीकच्या एकोशी गावात चाललेली जंगलाची कत्तल आणि डोंगर कटाई यांच्या विरोधात सामाजिक संदेश देणारा एक तरंगता आकाश कंदील इथल्या एकोशी बॉईजने तयार केलाय.
टेकडीची कटाई आणि जंगलतोड या गंभीर समस्यांकडे जनतेचं लक्ष जावे हा उद्देश ठेऊन सामाजिक संदेश देणारा म्हणून अशा प्रकारचा पहिला तरंगणारा आकाश कंदील तयार करण्यात आलाय.
अलिकडच्या काही महिन्यांत इथल्या पर्यावरणाचा चाललेला ह्रास हे एकोशीवासियांसमोरच एक आव्हान असल्याचे इथल्या ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी म्हणून हा अनोखा उपक्रम करण्यात आल्याचे इथल्या युवकांनी सांगितले.
"जंगल वाचवा, टेकड्या वाचवा,एकोशी गाव वाचवा" असा संदेश या आकाश कंदिलावर लिहिण्यात आला असून हा आकाश कंदील नदीत मध्यभागी ठेवण्यात आलाय.
आकाशकंदिलातील झगमगत्या दिव्यांनी केवळ नदीच सुशोभित केली नसून स्थानिक पर्यावरणाच्या रक्षणासाठी हातभार लावण्यासाठी रहिवाशांमध्ये जबाबदारीची भावना देखील प्रज्वलित केली असल्याचे एकोशी बॉईजचे म्हणणे आहे.
तरंगत्या दिव्यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या संदेशात एकोशीच्या डोंगराला जो धोका निर्माण झाला आहे, त्याविरुद्ध सर्वांनी एकत्र यावे हा या मागचा उद्देश असल्याचे या टीमचे म्हणणे आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.