डिचोलीत ईद-ए-मिलाद उत्साहात

'जुलूस' द्वारे शहरात शक्तीप्रदर्शन
ईद-ए-मिलाद निमित्त 
डिचोलीत 'जुलूस'
ईद-ए-मिलाद निमित्त डिचोलीत 'जुलूस' Dainik Gomantak
Published on
Updated on

Bicholim: नमाज, भव्य जुलूस (Procession) आदी परंपरिक कार्यक्रमांनिशी डिचोलीतील मुस्लिम बांधवांतर्फे (Muslim Community) आज मंगळवारी ईद -ए-मिलाद (Eid-e-Milad) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्त दुपारी डिचोलीत भव्य 'जुलूस' (मिरवणूक) काढण्यात आली. या मिरवणुकीत पाचशेहून अधिक मुस्लिम बांधवांनी सहभागी होत शक्तीप्रदर्शन केले. या मिरवणुकीत लहान मुलांची संख्या लक्षणीय होती. मिरवणूक मात्र सुरळीतपणे पार पडली.

ईद-ए-मिलाद निमित्त 
डिचोलीत 'जुलूस'
Goa: मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस पारंपारिक पद्धतीने साजरा

मुस्लिमवाडा येथून मिरवणुकीला प्रारंभ झाला. बसस्थानकापर्यंत आल्यानंतर मिरवणूक माघारी फिरली. ईद-ए-मिलादनिमित्त मुस्लिम बांधवांतर्फे नागरिकांना सरबतही वाटण्यात आले. एकमेकांना शुभेच्छाही देण्यात आल्या. इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त ईद-ए-मिलाद साजरी करण्यात येते. यादिवशी मुस्लिम बांधवांतर्फे समाजात सुखशांती लाभावी. अशी प्रार्थना करण्यात येते. दरम्यान, साखळी शहरात मुस्लिम बांधवांतर्फेही 'जुलूस' काढण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Calangute Police Mobile Theft Arrest
Margao Woman Cheated 33 lakhs
GMC cardiology department staff protest
ED Raids Goa Delhi Karnal
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com