Goa Education: 'बढती नको'! 30 शिक्षकांचा शिक्षण खात्याच्या प्रस्तावाला नकार

Education Department Goa: शिक्षण खात्याकडून टप्याटप्याने प्राथमिक शाळेतील शिक्षकांना बढती दिली जाते, त्यानुसार शिक्षण खात्याकडून शिक्षकांना बढतीच्या प्रस्ताव देण्यात आला होता
Goa government education
Goa government educationDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: शिक्षण खात्याकडून एकूण ९० प्राथमिक शिक्षकांना सहाय्यक शिक्षक म्हणून बढती देण्याचा निर्णय घेतला गेला होता, मात्र ३० शिक्षकांनी याला नकार दिला आहे तर ६० शिक्षकांनी या निर्णयाचा स्वीकार केलाय. शिक्षण खात्याकडून टप्याटप्याने प्राथमिक शाळेतील शिक्षकांना बढती दिली जाते, त्यानुसार शिक्षण खात्याकडून शिक्षकांना बढतीच्या प्रस्ताव देण्यात आला होता, ज्याला ३० शिक्षकांनी नकार दिलाय.

बढती प्रस्तावाला तीस जणांचा नकार

शिक्षण खात्यातर्फे प्राथमिक शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांना बढतीचा प्रस्ताव दिला जातो. त्याप्रमाणे यावेळी देखील ९० प्राथमिक शाळेतील शिक्षकांना बढतीच्या प्रस्ताव दिला गेला होता ज्यांपैकी ३० शिक्षकांनी हा प्रस्ताव नाकारला आहे तर बाकी ६० जणांनी याला संमती दर्शवली असल्याची माहिती शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी माध्यमांना दिला.

सरकारी शाळांमध्ये पुरेसे शिक्षक उपलब्ध व्हावेत म्हणून हा उपक्रम राबवला जातोय. गेल्या काही वर्षांपासून या धोरणाची अंमलबजावणी झाली नव्हती मात्र आता सरकारने हा निर्णय जारी करत ९० शिक्षकांना बढती देण्याचा निर्णय घेतलाय.

Goa government education
Portuguese Education System In Goa: कोकणीवर बंदी, लिसेव म्हणजे काय? पोर्तुगीज काळात कशी होती गोव्यात शिक्षण व्यवस्था?

अनेकांना प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक बनण्याची अपेक्षा असते आणि म्हणून ते अशा प्रस्तावांना नकार देतात,किंवा अनेक वर्षांपासून शिक्षक म्हणून काम केल्यानंतर सहाय्यक शिक्षक बनणं हे अनेकांना पटत नाही, दुय्यम वाटतं म्हणून त्यांच्याकडून असे प्रस्ताव फेटाळले जातात.

व्होकेशनलचा शिक्षक मुख्याध्यापक होऊ शकत नाही!

अलीकडेच डिचोलीतील श्री शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालयाच्या एका जेष्ठ शिक्षिकेकडून व्होकेशनलचा शिक्षक मुख्याध्यापक अथवा प्राचार्य होऊ शकत नाही यावर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने व्होकेशनल विभागातील शिक्षक यासाठी पात्र नसल्याचा दावा करत काही नियमांमध्ये दुरुती करण्याची गरज आहे या मुद्यावर प्रकाश टाकला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Black And White Podcast With Amit Patkar
Goa Teacher Transfer Controversy
Pedne Teacher Transfer Protest
Teachers role in shaping new generation
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com