ED Property Seizure Goa
ED RaidsDainik Gomantak

ED Raid In Goa: ईडीची मोठी कारवाई! जमीन घोटाळ्याचा मास्टरमाइंड मोहम्मद सुहैलच्या 193 कोटींच्या मालमत्तेवर टाच

ED Property Seizure Goa: जमीन हडप प्रकरणी ईडीने पुन्हा एकदा गोव्यात मोठी कारवाई केली. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मोहम्मद सुहैल उर्फ मायकल याच्याशी संबंधित बार्देश तालुक्यातील 193.49 कोटी रुपयांच्या 24 स्थावर मालमत्ता ईडीने जप्त केल्या.
Published on

पणजी: जमीन हडप प्रकरणी ईडीने पुन्हा एकदा गोव्यात मोठी कारवाई केली. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मोहम्मद सुहैल उर्फ मायकल याच्याशी संबंधित बार्देश तालुक्यातील 193.49 कोटींच्या 24 मालमत्ता ईडीने जप्त केल्या. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए), 2002 अंतर्गत ईडीने ही कारवाई केली, यामध्ये आसगाव, हणजुण, कळंगुट, नेरुल आणि पर्रा येथील मालमत्तांचा समावेश आहे. या प्रकरणातील ही दुसरी मोठी कारवाई असल्याचे ईडीकडून सांगण्यात आले.

यापूर्वी 31 मालमत्ता जप्त केल्या

यापूर्वी, याप्रकरणी ईडीने (ED) 2023 मध्ये 39.24 कोटींच्या 31 मालमत्ता जप्त केल्या होत्या. 15 एप्रिल 2024 रोजीच्या आदेशाद्वारे नवी दिल्लीतील न्यायिक प्राधिकरणाने (पीएमएलए) त्या जप्तीची पुष्टी केली होती. ईडीचा हा तपास गोवा पोलिसांनी नोंदवलेल्या आणि जमीन हडप प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) एफआयआरवर आधारित आहे. एफआयआरमध्ये बनावटगिरी, फसवणूक आणि अधिकृत नोंदींमध्ये फेरफार करुन जमीम बेकायदेशीररित्या बळकावल्याचा आरोप आहे.

मृत व्यक्तींच्या नावाने आरोपींनी बनवली बनावट कागदपत्रे

ईडीच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी मृत व्यक्तींच्या किंवा त्यांच्या पूर्वजांच्या नावे बनावट कागदपत्रे वापरुन त्यांची आणि त्यांच्या सहकाऱ्यांची नावे सरकारी जमिनीच्या नोंदींमध्ये बनावटरित्या समाविष्ट केली. या बेकायदेशीररित्या बळकावलेल्या मालमत्ता नंतर वेगळ्याच लोकांना विकण्यात आल्या. तसेच, बनावट विक्री करारांद्वारे सहयोगींना हस्तांतरित करण्यात आल्या.

ED Property Seizure Goa
ED Raids Goa Casinos: कर चुकवेगिरी, फ्रॉड व्यवहारांची चौकशी; ईडीची उशीरा रात्री कॅसिनोत झाडाझडती

ईडीच्या नव्या जप्तीमध्ये विकल्या गेलेल्या मालमत्ता, बोगस व्यवहारांद्वारे हस्तांतरित केलेल्या मालमत्ता आणि चालू तपासादरम्यान ओळखल्या गेलेल्या इतर मालमत्तांचा समावेश आहे. या ताज्या कारवाईसह या प्रकरणी जप्त केलेल्या मालमत्तेची एकूण किंमत 232.73 कोटी एवढी आहे. ईडीने 12 एप्रिल 2024 रोजी म्हापसा येथील विशेष न्यायालयात (पीएमएलए) या प्रकरणी आरोपपत्र दाखल केले होते. ज्याची दखल घेतली न्यायालयाने (Court) घेतली असून पुढील तपास सुरु करण्याचे आदेश दिले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com