Goa Drug Case: ड्रग रॅकेटचा पर्दाफाश, हणजूण येथे 5 लाख रुपयांच्या गांजासह एकाला अटक

Goa Crime: गोवा पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ५ लाख रुपयांच्या गांजासह एका तरुणाला अटक केली आहे.
Goa Drug Case
Goa Drug CaseDainik Gomantak
Published on
Updated on

हणजूण: गोवा पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ५ लाख रुपयांच्या गांजासह एका तरुणाला अटक केली आहे. मंगळवारी (ता. ३०) गुप्त माहितीच्या आधारे हणजूण पोलिसांनी छापा टाकत ही कारवाई केली.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सोनू यादव (२९) असून तो उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे. पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे ५ लाख रुपयांचा ५,०१० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. हणजूण पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ही कारवाई केली.

राज्यातील प्रसिध्द पर्यटनस्थळी ड्रग्सचे प्रमाण वाढत असल्याने पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे. हणजूण, वागातोर, आणि बागा यांसारख्या परिसरांमध्ये पोलिसांकडून विशेष लक्ष देण्यात येत आहे. यापूर्वीही हणजूण परिसरात मोठ्या प्रमाणावर ड्रग्स विरोधी मोहीम राबवण्यात आली होती.

Goa Drug Case
FC Goa: 'आम्ही अंतिम फेरीसाठी पात्र ठरणार का, हे गोव्यात ठरेल, प्रशिक्षक मार्केझ यांचे प्रतिपादन, आता आव्हान बंगळूरचे

याआधी, रविवारी (३० मार्च) गोवा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी सेलनं (ANC) ड्रग्ज तस्करीविरोधात मोठी कारवाई करत महाराष्ट्रातील एका व्यक्तीला अटक केली होती. त्याच्याकडून २५.१० लाख रुपये किमतीचा ड्रग्ज जप्त करण्यात आला आहे.

गोवा सीमेच्या जवळील पत्रादेवी चौकीवर ही कारवाई करण्यात आली होती. त्याच्याकडून २०८ ग्रॅम एक्स्टेसी पावडर आणि ४३ उच्च-शक्तीच्या एक्स्टेसी गोळ्या जप्त केल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Canacona Police Arrest Waiter
Margao Woman Cheated 33 lakhs
Vagator Beach Hostel Drug Racket
Goa Drug Racket Bust
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com