चक्रीवादळात पडलेल्या झाडांचे तुकडे स्मशानभूमीला दान

तोक्ते चक्रीवादळामुळे पणजीतील सुमारे ४० च्या आसपास जुनाट वृक्ष कोसळले. त्याचबरोबर अनेक झाडांच्या फांद्या कोसळून पडल्या
Donate pieces of fallen trees to the cemetery
Donate pieces of fallen trees to the cemetery Dainik Gomantak

पणजी शहरामध्ये तोक्ते चक्रीवादळामुळे जी मोठमोठी झाडे पडली होती, त्या झाडांचे तुकडे करून सदर लाकडे पणजी येथील स्मशानभूमीला मोफत देण्यात आली आहेत. पणजी स्मशानभूमीचे लाकडांचे कोठार भरल्यानंतर पणजी परिसरातील पंचायतीच्या स्मशानभूमीसाठी ही लाकडे मोफत देण्यात येत असल्याची माहिती पणजी महापालिकेचे उपमहापौर वसंत आगशीकर यांनी दिली आहे.

Donate pieces of fallen trees to the cemetery
Goa : सावंत सरकार म्हणजे 'दुर्गंधी युक्त कचरा यार्ड' कॉंग्रेस प्रवक्त्यांचं वक्तव्य

तोक्ते चक्रीवादळामुळे पणजीतील सुमारे ४० च्या आसपास जुनाट वृक्ष कोसळले. त्याचबरोबर अनेक झाडांच्या फांद्या कोसळून पडल्या. पणजी अग्निशामक दल व पणजी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी एकत्रीतपणे यासर्व झाडांचे तुकडे केले. त्यानंतर ही लाकडे पणजी स्मशानभूमीसाठी पहिला टप्प्यामध्ये पोचवण्यात आली. तेथील लाकडांचे कोठार भरल्यामुळे उर्वरित सर्व लाकडे पणजी येथील मांडवी पुलाच्या खाली ठेवण्यात आलेली असून तेथून ती पणजी परिसरातील स्मशानभूमीसाठी मोफत देण्यात येणार आहेत. अशी माहिती आगशीकर यांनी दिली.

झाडे तोडण्यास बंदी असल्यामुळे राज्यात स्मशानभूमीसाठी लाकडे मिळणे दुरापास्त झालेले आहे. या पार्श्वभूमीवर पणजी महापालिकेने उचललेले पाऊल लोकांना दिलासा देणारे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com