Divya Rane: गोव्यात लवकरच बॉटनिकल उद्यानात योगा अन् नॅचरोपथी प्रकल्पांचे आगमन

Divya Rane: लोकांचे हित आणि ग्रामीण भागाचा विकासासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
Divya Rane
Divya RaneDainik Gomantak

Divya Rane: सांगे मतदारसंघातील साळावली धरण परिसरातील बॉटनिकल उद्यानात योगा व नॅचरोपथी प्रकल्प येणार असून या प्रकल्पामुळे सांगे भागातील लोकांना रोजगाराच्या संधी प्राप्त होणार आहेत. ग्रामीण भागाचा पर्यटनदृष्ट्या विकास होईल, असे फॉरेस्ट डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या अध्यक्ष तथा आमदार दिव्या राणे यांनी सांगितले. काल त्यांनी आमदार सुभाष फळदेसाई यांच्यासह बॉटनिकल उद्यानाला भेट देऊन पाहणी केली.

उगे पंचायतीच्या सरपंच भारती नाईक, आयएफएस संतोष कुमार व इतर अधिकारी उपस्थित होते. सांगे मतदारसंघाला निसर्गाचे भरभरून वरदान लाभले आहे. याचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्यासाठी केरळ राज्याप्रमाणे बॉटनिकल उद्यानात कुटिरे उभी करून त्यातून देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांना योगा, नॅचरोपथी, पंच कर्म, अशा चांगल्या सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे दिव्या राणे यांनी सांगितले.

Divya Rane
Petrol-Diesel Price In Goa: गोव्यात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या आजचे दर

धरण परिसरात वन विभागाची बरीच जमीन असून यात हा प्रकल्प येणार आहे. हा प्रकल्प पीपीपी तत्त्वावर देण्यात येईल. यासाठी लवकरच निविदा काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सांगे येथील हे बॉटनिकल उद्यान पाहण्यासाठी बरेच पर्यटक येतात, त्यांना आणखी सुविधा पुरविण्यासाठी आमचा प्रयत्न असेल.

बरेच शहरी भागातील लोक सुट्टी घालवण्यासाठी ग्रामीण भागाकडे वळत असल्याने याचा फायदा येथे होणार आहे. त्यामुळे या भागातील लोकांनाही रोजगार मिळणार असल्याने असे लोकोपयोगी प्रकल्प येणे गरजेचे असल्याचे राणेयांनी सांगितले.

सांगेतच ‘आयआयटी’

सांगे मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध असून यातून लोकांना रोजगार कसा मिळेल, यासाठी माझे प्रयत्न असून कोणी कितीही कट रचून विरोध करण्याचे नाटक जरी केला, तरी आयआयटी प्रकल्प सांगे मतदारसंघातच होणार, असे फळदेसाई यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com