नृसिंह सातेरी संस्थानाच्या प्रांगणात 2551 पणत्या प्रज्वलीत करून केला दीपोत्सव साजरा

श्री विष्णूंची अस्त्रे असलेली सुदर्शन चक्र, पद्म (कमळ), शंख आणि गदा साहाय्याने प्रांगणात रेखाटून त्यावर सहस्त्र पणत्या प्रज्वलीत केल्या होत्या.
नृसिंह सातेरी संस्थानाच्या प्रांगणात 2551  पणत्या प्रज्वलीत केल्या.
नृसिंह सातेरी संस्थानाच्या प्रांगणात 2551 पणत्या प्रज्वलीत केल्या.Dainik Gomantak
Published on
Updated on

दाबोळी: वास्को चिखली येथील श्री नृसिंह सातेरी (Narsingh Sateri) संस्थानाच्या प्रांगणात गुरुवारी सायंकाळी सहस्त्र दीप प्रज्वलन करून दीपोत्सव साजरा करण्यात आला. रोटरॅक्ट क्लब वास्को, रोटरी क्लब वास्को, रोटरी क्लब ऑफ वास्को पोर्ट टाऊन व सम्राट क्लब वास्को यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या सहस्त्र दीप प्रज्वलन कार्यक्रमात यंदा 2551 पणत्या प्रज्वलीत करण्यात आल्या.

संस्थेच्या (Organization) प्रांगणात श्री विष्णूंची अस्त्रे असलेली सुदर्शन चक्र, पद्म (कमळ), शंख आणि गदा साहाय्याने प्रांगणात रेखाटून त्यावर सहस्त्र पणत्या प्रज्वलीत केल्या होत्या. पांत्याची आरास करण्यास श्री महादेव महिला मंडळाचे सहकार्य लाभले.

नृसिंह सातेरी संस्थानाच्या प्रांगणात 2551  पणत्या प्रज्वलीत केल्या.
कामगार सेनेच्या आंदोलनामुळे दाबोळी विमानतळावर प्रवाशांचे हाल

सुवासिनी महिलांनी श्री नृसिंह सातेरी व संलग्र अन्य देवतासमोर दीप प्रज्वलित केले. रोट्रॅक्ट क्लब वास्कोचे अध्यक्ष दत्तराज गावस यांनी उपस्थीत सर्वांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रोहन बांदेकर यांनी केले. या कार्यक्रम प्रसंगी रोट्रेक्ट क्लब फोंडाचे अध्यक्ष किशन मंगेशकर, पणजीचे तेजस कामत व मडगावचे लायनल गोम्स यांची खास उपस्थिती होती तसेच सहभागी क्लबांचे सदस्य, त्यांचा परिवार व चिखली परिसरातील रहवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून चीखली पंचायतीचे पंच युवराज वळवईकर तसेच सन्मानिय पाहुणे म्हणून गणेश बेंझोपलास्टचे टर्मिनल वेवस्थापक अंकित सेंगर तसेच नृसिंह सातेरी देवस्थानचे अध्यक्ष हनुमंत गावडे, रोटरी क्लब वास्कोचे अध्यक्ष राजकुमार तोमर, रोटरी क्लब वास्को पोर्ट टाऊनच्या अध्यक्षा कविता दायलानी, सम्राट क्लब वास्कोचे अध्यक्ष जयराम पेडणेकर व रोट्रॅक्ट क्लब वास्कोचे अध्यक्ष दत्तराज गावस उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते पारंपरिक समई व पणती प्रज्वलीत केल्यावर उपस्थितांनी पणत्या प्रज्वलीत करून य दीपोत्सवाचा आनंद लुटला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Karapur One Goa Project Protest
Goa First Alliance 2027
Viresh Borkar RG Goa
Morjai Temple Property Misappropriation
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com